Nirmala Sitharaman Sakal
Personal Finance

Nirmala Sitharaman: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अर्थमंत्री सीतारामन यांच्या चौकशीस स्थगिती

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निवडणूक रोख्यांच्या गैरव्यवहाराबाबत सुरू असलेली चौकशी उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. याबाबत पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/बंगळूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांविरुद्ध आता रद्द झालेल्या निवडणूक रोख्यांद्वारे पैसे गोळा केल्याप्रकरणी चौकशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

‘एफआयआर’मध्ये त्यांच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे नेते नलिनकुमार कटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश एम. नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली.

या वेळी अंतरिम आदेश जारी करून या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवली आहे. निवडणूक रोख्यांच्या अनियमिततेशी संबंधित तक्रारीनंतर विशेष न्यायालयाच्या निर्देशानुसार सीतारामन आणि इतरांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला.

सीतारामन, ईडी अधिकारी आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध कर्नाटकमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचेही एफआयआरमध्ये नाव आहे. जनाधिकार संघर्ष परिषद (जेएसपी)चे सहसंस्थापक आदर्श आर. अय्यर यांनी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Koyna Dam Rainfall Eases: कोयना धरण पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर, विसर्गात कपात

Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT