kotak life insurance launches gen to gen protect scheme Sakal
Personal Finance

कोटक लाईफ इन्शुरन्सतर्फे ‘जेन टू जेन प्रोटेक्ट’ योजना

‘‘कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट या योजनेतून आमचे ग्राहक त्यांच्या दोन पिढ्यांना एकाच टर्म योजनेतून संरक्षण कवच प्रदान करु शकतात.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनीने दोन पिढ्यांना एकाच योजनेत विमा संरक्षण देण्याचा पर्याय असलेली ‘कोटक जेन टू जेन प्रोटेक्ट’ ही नवी विमा योजना दाखल केली आहे. विमा उद्योगात प्रथमच असा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या योजनेअंतर्गत पालक (प्राथमिक जीवन विमाधारक) वयाची साठ किंवा पासष्ट वर्षे पूर्ण करतात तेव्हा संपूर्ण जोखीम संरक्षण मुलाला हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. हे जोखीम कवच मुलाच्या वयाच्या साठव्या वर्षापर्यंत टिकते.

यात सुदृढ आरोग्य राखल्याबद्दल लाभ, अपघाती मृत्यू लाभ, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास लाभ तसेच गंभीर आजारात मदत यासारखे पूरक लाभही विमाधारकास मिळतात. महिला विमाधारकांसाठी यात अतिरिक्त पाच टक्क्यांचा मृत्यूलाभही देण्यात आला आहे.

कोटक महिंद्र लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी महेश बालसुब्रमणियन म्हणाले, ‘‘कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट या योजनेतून आमचे ग्राहक त्यांच्या दोन पिढ्यांना एकाच टर्म योजनेतून संरक्षण कवच प्रदान करु शकतात.

यातून भारतीयांच्या कुटुंब, परंपरा आणि वारसा याला दिलेले महत्त्व अधोरेखित होते. ही नाविन्यपूर्ण उत्पादने विम्याचा विस्तार करण्यास मदत करतील आणि २०४७ पर्यंत ''सर्वांसाठी विमा'' या विमा नियामकाच्या उद्दिष्टासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT