Gautam Adani Sakal
Personal Finance

Gautam Adani: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात गौतम अदानींचे ट्विट चर्चेत; म्हणाले, ज्ञान आणि शांतीचे...

Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमाची केवळ भारतातच नाही जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशातील लोक उत्साहात आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

राहुल शेळके

Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमाची केवळ भारतातच नाही जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशातील लोक उत्साहात आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अयोध्येत राम मंदिर कार्यक्रमादरम्यान देशातील सुमारे 880 उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

गौतम अदानी यांनी केले ट्विट

उद्योगपती आणि अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी आज राम मंदिर सोहळ्या दिवशी ट्विट करून अयोध्या शहर आणि राम मंदिर हे देशासाठी ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार उघडले जातील असे म्हणले आहे. गौतम अदानी यांनी लिहिले की-

"आज या शुभ प्रसंगी जेव्हा अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडले जातील, तेव्हा ते ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनू दे, भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सौहार्दाच्या चिरंतन धाग्यांनी समुदायांना बांधू दे..."

अयोध्येत आज राम मंदिराचा भव्य सोहळा होणार आहे. या ऐतिहासिक दिवशी रामलल्ला नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात विराजमान होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजकारण, क्रीडा आणि अध्यात्माशी संबंधित अनेक व्यक्तींनाही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

अयोध्येत राम मंदिर कार्यक्रमादरम्यान देशातील सुमारे 880 उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुमारे 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय साध्या वेशातील पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. अयोध्येतील धर्मपथ, रामपथ, हनुमानगढीपासून प्रत्येक भागात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT