LIC receives GST notice Sakal
Personal Finance

LIC GST Notice: एलआयसीला पुन्हा GSTचा दणका! कंपनीला पाठवली 663 कोटींची नोटीस, काय आहे कारण?

LIC GST Notice: LIC ला GST कडून दुसरी नोटीस मिळाली आहे. जीएसटी विभागाने 663 कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या एका आठवड्यात एलआयसीला मिळालेली ही दुसरी जीएसटी नोटीस आहे. एलआयसीला सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त, चेन्नई उत्तर आयुक्तालय यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस मिळाली आहे.

राहुल शेळके

LIC GST Notice: LIC ला GST कडून दुसरी नोटीस मिळाली आहे. जीएसटी विभागाने 663 कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या एका आठवडभरात एलआयसीला मिळालेली ही दुसरी जीएसटी नोटीस आहे. एलआयसीला सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त, चेन्नई उत्तर आयुक्तालय यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस मिळाली आहे.

एलआयसीला ही नोटीस 1 जानेवारीला मिळाली. त्यानंतर कंपनीने शेअर बाजारांनाही 3 जानेवारीला नोटीसची माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर न भरल्यामुळे LIC ला सुमारे 663.45 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.

कंपनीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीचा फायदा घेतल्याचे डिमांड नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीसमध्ये, एलआयसीला दिलेल्या मुदतीत अपील करण्याची संधी देण्यात आली आहे. कंपनी या नोटीस विरोधात अपील आयुक्त, चेन्नई यांच्याकडे अपील करू शकते.

या अगोदर एलआयसीला तीन राज्यांनी जीएसटी नोटीस पाठवली आहे. यामध्ये तामिळनाडू, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांचा समावेश होता. या तीन राज्यांनी एलआयसीला व्याज आणि दंडासह 667.5 कोटी रुपयांची मागणी केली होती.

एलआयसीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले होते की, ते या नोटिसांविरुद्ध चेन्नई, डेहराडून आणि अहमदाबाद येथील आयुक्तांसमोर अपील दाखल करणार आहेत.

जीएसटीने नोटीस पाठवल्यानंतर, एलआयसीने सांगितले की, कंपनी आयुक्तांसमोर अपील करणार आहे. मात्र, या GST नोटिसीचा कंपनीच्या आर्थिक किंवा इतर कोणत्याही कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT