LIC Policy
LIC Policy  google
Personal Finance

LIC Policy : २५६ रुपयांची गुंतवणूक देईल ५४ लाखांचा परतावा

नमिता धुरी

मुंबई : देशातील बहुतेकांना सर्वात विश्वसनीय भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) गुंतवणूक करायला आवडते. त्यात गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.

तुम्ही एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एलआयसी जीवनलाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला दररोज २५६ रुपयांच्या गुंतवणुकीवर ५४ लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम मिळवण्याची उत्तम संधी मिळत आहे. (LIC Jeevan Labh Policy ) हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

एलआयसीची ही योजना नॉन-लिंक्ड आणि नफा देणारी आहे. यामध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदतही मिळते. यासोबतच नॉमिनीला पूर्ण पैसे मिळतात.

जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत टिकून राहिला तर त्याला हे पैसे मिळतात. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना स्वतःहून प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार मिळतो.

८ ते ५९ वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या पॉलिसी अंतर्गत, विमा धारक १०, १३ आणि १६ वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात, जे १६ ते २५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर पैसे दिले जातील. ५९ वर्षांची व्यक्ती १६ वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडू शकते, जेणेकरून त्याचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त नसेल.

या योजनेत तुम्ही दररोज २५६ रुपये गुंतवल्यास आणि दरमहा ७७०० रुपये गुंतवले तर वार्षिक ९२ हजार ४०० रुपये जमा होतील.

हे पैसे तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षी २५ वर्षांसाठी गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्हाला सुमारे २० लाख रुपये जमा करावे लागतील. पॉलिसी धारकाला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर सुमारे ५४ लाख रुपये मिळतील.

देशातील बहुतेक लोक विम्यासाठी केवळ एलआयसी पॉलिसी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यामध्ये कौटुंबिक विम्यासोबतच गुंतवलेली रक्कमही सुरक्षित राहते.

एलआयसीची ही पॉलिसी प्रत्येक वर्गासाठी उपलब्ध आहे. हे विमा धारकांना स्वतःच्या इच्छेनुसार प्रीमियम गोळा करण्याचा अधिकार देते. एलआयसीच्या सर्व पॉलिसींमध्ये गुंतवणूक करणे हा सुरक्षित पर्याय मानला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT