LIC Q2 results Net profit falls 50 percent to Rs 7,925 crore on lower income  Sakal
Personal Finance

LIC Q2 results: LIC ला मोठा झटका, कंपनीचा निव्वळ नफा 50 टक्क्यांनी घसरला, उत्पन्नही झाले कमी

LIC Q2 results: कंपनीच्या उत्पन्नातही घट झाली आहे.

राहुल शेळके

LIC Q2 results: सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यावेळी एलआयसी कंपनीचा नफा कमी झाला आहे. एलआयसीचा निव्वळ नफा निम्मा झाला आहे. कंपनीच्या उत्पन्नातही घट झाली आहे.

कंपनीचा निव्वळ नफा 50% ने घसरून 7,925 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 15,952 कोटी रुपये होता. एलआयसीने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्यांचे निव्वळ उत्पन्न 1,07,397 कोटी रुपयांवर घसरले आहे.

LIC ने मे 2022 मध्ये सर्वात मोठा IPO आणला होता. कंपनीने 949 रुपये प्रति शेअर या भावाने बाजारातून पैसे उभे केले होते. परंतु शुक्रवारी, 10 नोव्हेंबर 2023 रोजी बाजार बंद झाल्यावर 949 रुपयांची किंमत असलेले शेअर्स 610 रुपयांवर बंद झाले.

याचा अर्थ गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 36 टक्के किंवा प्रति शेअर 339 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. एलआयसीचे बाजार भांडवल 3.86 लाख कोटी रुपयांवर आले आहे. ज्या इश्यू प्राइसवर LIC ने IPO आणला होता, तिचे मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच LIC च्या बाजार भांडवलात 2.14 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मार्फत लोकांना जीवन विमा दिला जातो. LIC च्या अनेक योजना आहेत ज्या जीवन विम्याशी संबंधित आहेत. याशिवाय एलआयसीकडे आरोग्य विमा योजनाही आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या नफ्यात झालेली घसरण चिंताजनक आहे. एलआयसीच्या निव्वळ प्रीमियम उत्पन्नातही घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT