LIC receives GST notice for Rs 806 crore  Sakal
Personal Finance

GST Notice: LICला मोठा धक्का! जीएसटीने बजावली 806 कोटींची नोटीस; तरीही शेअरमध्ये 3 टक्के वाढ

GST Notice: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ला 806 कोटी रुपयांची GST नोटीस मिळाली आहे. असे असूनही काल बीएसईच्या इंट्रा-डेमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि दिवसअखेर शेअर सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

राहुल शेळके

GST Notice: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ला 806 कोटी रुपयांची GST नोटीस मिळाली आहे. असे असूनही काल बीएसईच्या इंट्रा-डेमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि दिवसअखेर शेअर सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे जीएसटी नोटिसीच्या विरोधात अपील करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे आणि दुसरे म्हणजे एशियन पेंट्स या आघाडीच्या पेंट कंपनीतील हिस्सा वाढवला आहे. या दोन्ही कारणांमुळे कंपनीचा शेअर 3.56 टक्क्यांनी वाढून इंट्रा-डेमध्ये 863.00 वर पोहोचला. दिवसअखेर तो 3.01 टक्क्यांच्या वाढीसह 858.35 रुपयांवर बंद झाला.

जीएसटी नोटीस का मिळाली?

एलआयसीने काल त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये पाठवलेल्या माहितीनुसार, राज्य कर उपायुक्त, मुंबई यांनी 806.3 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस पाठवली आहे. मात्र, या आदेशाविरोधात अपील करणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

एलआयसीला मिळालेल्या नोटीसमध्ये 365.02 कोटी रुपयांचा जीएसटी, 404.7 कोटी रुपयांचा दंड आणि 36.5 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.

लाइफ इन्शुरन्स कंपनीला ही नोटीस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) परत न करणे, GSTR-3B सह उशीरा पेमेंटवर व्याज देणे यासंबंधी दिली गेली आहे.

एलआयसीचे म्हणणे आहे की या प्रकरणी आयुक्तांकडे अपील करणार आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की या नोटीसमुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा आर्थिक आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT