LIC receives GST notice of Rs 183 crore from Telangana tax authority  Sakal
Personal Finance

GST Notice: एलआयसीला पुन्हा GST ची नोटीस; व्याज आणि दंडासह केली 183 कोटींची मागणी, काय आहे प्रकरण?

LIC GST Notice: कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली

राहुल शेळके

LIC GST Notice: भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) तेलंगणा सरकारकडून 183 कोटी रुपयांहून अधिक रकमेची GST नोटीस मिळाली आहे. उपायुक्त राज्य कर, वारंगल, तेलंगणा यांनी ही नोटीस पाठवली आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत, नोटीसमध्ये 81,18,43,219.98 रुपये जीएसटी, 93,76,78,918.00 रुपये दंड आणि 8,11,84,320.00 रुपये व्याज वसूल करण्यात आल्याचे म्हटले आहे.

LICचे म्हणणे आहे की ही नोटीस आर्थिक वर्ष 2017-18 साठी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पेमेंटच्या संदर्भात ही नोटीस पाठवली आहे.

एलआयसीचे म्हणणे आहे की, या नोटीसमुळे त्यांचे कामकाज, आर्थिक आणि इतर कामावर परिणाम होणार नाही. LIC शेअर्सवर GST नोटीस मिळाल्याचा कोणताही प्रभाव दिसला नाही. 11 डिसेंबर रोजी, सकाळी बीएसईवर शेअर 774.05 रुपये आणि एनएसईवर 775 रुपयांवर उघडला. एलआयसीच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत सुमारे 30 टक्के परतावा दिला आहे.

LIC म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंटमध्ये 25 कोटींची गुंतवणूक

एलआयसीने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की कंपनीच्या बोर्डाने एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडमध्ये 25 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. LIC म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडची सुरुवात 1989 मध्ये झाली.

त्यात एलआयसीची 45 टक्के भागीदारी आहे. यानंतर एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडे 39.30 टक्के, जीआयसी हाऊसिंग फायनान्सचे 11.70 टक्के आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे 4 टक्के स्टेक आहेत.

एलआयसीला अनेकवेळा जीएसटी नोटिसा मिळाल्या आहेत. कंपनीला सप्टेंबरमध्ये 290 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली होती. बिहार- अतिरिक्त आयुक्त राज्य कर (अपील), केंद्रीय विभाग यांनी 290 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती.

ज्यामध्ये 168.8 कोटी रुपयांची जीएसटी, 107.1 कोटी रुपयांचे व्याज आणि 16.7 कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. एलआयसीवर असा आरोप आहे की एलआयसीने पॉलिसीधारकांकडून प्राप्त केलेल्या प्रीमियमवर घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट परत केले नाही आणि इतर काही नियमांचे उल्लंघन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT