Worlds Top valuable Insurance Brands Sakal
Personal Finance

LIC: एलआयसी बनली जगातील सर्वात मजबूत विमा कंपनी; SBI-HDFC सह अनेक कंपन्यांना टाकले मागे

Worlds Top valuable Insurance Brands: विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC हा जागतिक स्तरावर मजबूत विमा कंपनी म्हणून उदयास आली आहे. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100, 2024 च्या अहवालानुसार, LIC चे ब्रँड मूल्य 9.8 बिलियन डॉलर वर स्थिर आहे.

राहुल शेळके

Worlds Top valuable Insurance Brands: विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC हा जागतिक स्तरावर मजबूत विमा कंपनी म्हणून उदयास आली आहे. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100, 2024 च्या अहवालानुसार, LIC चे ब्रँड मूल्य 9.8 बिलियन डॉलर वर स्थिर आहे.

ब्रँड फायनान्स इन्शुरन्सने दिलेल्या निवेदनानुसार, कॅथे लाइफ इन्शुरन्स हा एलआयसीनंतरचा दुसरा सर्वात मजबूत ब्रँड आहे. कॅथे लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड मूल्य नऊ टक्क्यांनी वाढून 4.9 अब्ज डॉलर आहे. त्यानंतर NRMA विमा आहे, ज्याचे ब्रँड मूल्य 82 टक्क्यांनी वाढून 1.3 अब्ज डॉलर झाले आहे. (LIC Emerges As Worlds Strongest Insurance Brand Report)

निवेदनानुसार, चीनच्या विमा ब्रँडने जागतिक क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. पिंग एन ब्रँडचे चार टक्क्यांनी मूल्य वाढवून 33.6 अब्ज डॉलरपर्यंत गेले आहे. यानंतर, चायना लाइफ इन्शुरन्स आणि CPIC अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

एलआयसीचे 39,090 कोटी रुपयांचे प्रीमियम कलेक्शन

एलआयसी इंडियाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्षाचे सर्वाधिक 39,090 कोटी रुपयांचे प्रीमियम कलेक्शन साध्य केले, तर SBI लाइफ इन्शुरन्स आणि HDFC लाइफ इन्शुरन्सने अनुक्रमे रु. 15,197 कोटी आणि रु. 10,970 कोटींचे नवीन प्रीमियम कलेक्शन केले.

एलआयसीचे शेअर्स सर्वकालीन उच्चांकावर

सरकारने ऑगस्ट 2022 पासून LIC कर्मचाऱ्यांसाठी 17 टक्के वेतन सुधारणेला मंजुरी दिली होती, ज्यामुळे 1,10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा झाला. LIC च्या शेअर्सनी देखील 1,175 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला, ज्यामुळे ती भारतातील सर्वात मौल्यवान सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) कंपनी बनली आहे.

एका अहवालानुसार, 2019 मध्ये देशातील 29 कोटी लोकांकडे LIC ची पॉलिसी होती. 15 ऑक्टोबर 2005 पर्यंत, LIC ने 1,01,32,955 नवीन पॉलिसी जारी करण्याचा आकडा ओलांडला होता.

एलआयसी नेटवर्क

आज LICच्या 2048 शाखा कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 8 क्षेत्रीय कार्यालये, 1381 सॅटेलाईट कार्यालयांसह व्यवसाय करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT