maggi noodles case nestle gets relief from ncdrc after 9 years Sakal
Personal Finance

Maggi Noodles: मॅगी नूडल्स प्रकरणात 9 वर्षांनंतर नेस्ले कंपनीला दिलासा; आता 640 कोटी भरावे लागणार नाहीत

Maggi Noodles Case: मॅगी नूडल्समध्ये शिशासारखे घातक रसायन पदार्थ वापरल्याचा आरोप असलेल्या नेस्लेला 9 वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) 2015 मध्ये सरकारने दाखल केलेली तक्रार फेटाळली आहे.

राहुल शेळके

Maggi Noodles Case: मॅगी नूडल्समध्ये शिशासारखे घातक रसायन पदार्थ वापरल्याचा आरोप असलेल्या नेस्लेला 9 वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) 2015 मध्ये सरकारने दाखल केलेली तक्रार फेटाळली आहे.

ग्राहक व्यवहार विभागाने नेस्ले इंडिया लिमिटेडविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी कंपनीकडून 639 कोटी रुपयांहून अधिक भरपाईची मागणी करण्यात आली होती.

NCDRC ने नेस्ले इंडिया विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावल्याने FMCG कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. एनसीडीआरसीने हा निर्णय 2 एप्रिल रोजी दिला होता, त्याची प्रत बुधवारी कंपनीला मिळाली.

मर्यादेपेक्षा जास्त रसायनांचा वापर केल्याचा आरोप

नेस्लेने सांगितले की, 'केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 2015 मध्ये NCDRC कडे दाखल केलेल्या तक्रारीत कंपनीने धोकादायक-दोषयुक्त घटक असलेले मॅगी नूडल्स तयार करून लोकांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता. मॅगी नूडल्समध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त रसायनांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी सरकारने नेस्लेकडे 284.55 कोटी रुपये भरपाई आणि 355.41 कोटी रुपयांची दंडात्मक नुकसान भरपाई मागितली होती. सरकारची ही मागणी NCDRC ने 9 वर्षांनंतर फेटाळली आणि निर्णय कंपनीच्या बाजूने दिला.

बाजारातून मॅगी गायब झाली होती!

2015 मध्ये, नेस्लेच्या मॅगी नूडल्समध्ये धोकादायक रसायनांचा वापर केल्याच्या आरोपानंतर, उत्पादनावर 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. कंपनीला बाजारातून सुमारे 38,000 टन नूडल्स परत मागवून घ्यावे लागले होते. मॅगी नूडल्स बाजारातून पूर्णपणे गायब झाले होते. नोव्हेंबर 2015 मध्ये, निर्बंध शिथिल करण्यात आले आणि मॅगी नूडल्स पुन्हा एकदा बाजारात दिसू लागले.

नेस्ले इंडियाचा व्यवसाय

NCDRC कडून मोठा दिलासा दिल्यानंतर नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. शुक्रवारी सकाळी NSE वर कंपनीचे शेअर्स सुमारे 19 रुपयांच्या वाढीसह 2,568 रुपयांवर व्यवहार करत होते.

मात्र, दुपारी 2 च्या सुमारास कंपनीचे शेअर्स किंचित घसरून 2,543 रुपयांपर्यंत खाली आले. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4.38% वाढीसह 655.61 कोटी रुपये होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT