Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2025-26 या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारचे हे पहिलेच पूर्ण अधिवेशन आहे. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रासंबंधित मोठ्या घोषणा झाल्या आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा विकास वाढत असताना त्याच्या शिक्षणासंबंधित मोठी घोषणा झाली. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीच्यावतीने 10 हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर वाढवण्यासाठी 500 कोटीचे बजेट देण्याची घोषणा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.