Maharashtra government Schemes for Women  Sakal
Personal Finance

Schemes for Women: महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कोणत्या योजना राबवत आहे? सर्व माहिती फक्त एका क्लिकवर

Schemes for Women: केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनांची घोषणा केली जात आहे. राज्यात सध्या लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Schemes for Women: केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनांची घोषणा केली जात आहे. राज्यात सध्या लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची चर्चाही लोकांमध्ये आहे. याचा फायदा घेण्यासाठी महिला गर्दी करताना दिसत आहेत.

सुरुवातीला मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारने ही योजना सुरू केली आणि नंतर महाराष्ट्रात या योजनेची सुरुवात झाली. योजनेअंतर्गत, महिलांना 1,500 रुपये मासिक मदत (वार्षिक रु 18,000) मिळते. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा आतापर्यंत दीड कोटी महिलांना फायदा झाला आहे.

आर्थिक मदतीसोबतच, सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षासारख्या आंतरराष्ट्रीय संकटांमुळे घरगुती गॅसच्या किमती वाढल्या आहेत. यातून जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंर्तगत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना दरवर्षी 3 मोफत एलपीजी सिलिंडर दिले जात आहेत.

सुकन्या समृद्धी योजना आणि राज्यात महिलांना 50% प्रवासात सवलत या योजनांमुळे राज्यातील महिलांचा आर्थिक सहभाग वाढत आहे. शिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या गृहनिर्माण प्रकल्पांंमुळे महिलांना फायदा होत आहे. वरील योजनांमुळे महिलांना शिक्षण, आर्थिक सहाय्य, आरोग्य आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच या योजनांमुळे महिलांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडिया आघाडीला हादरा देण्याचा भाजपचा प्लॅन? शिवसेना-NCP-TCMनंतर अखिलेश यादवांची सपा फुटीच्या उंबरठ्यावर

'US पॅसिफिक कमांड', अमेरिकेनं हटवला 'इंडो' शब्द; भारताचा उल्लेख करत मोठी घोषणा

Vande Bharat: कोकणातल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! वंदे भारत डब्यांची संख्या दुप्पट होणार

Latest Marathi News Live Update : अफगाण जनतेसाठी भारताकडून पुन्हा पाच टन अत्यावश्यक औषधांची मदत

Dharashiv Politics : उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू खासदार देणार धक्का! ओमप्रकाश राजेनिंबाळकर ठाकरे गट सोडणार? धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप

SCROLL FOR NEXT