Maharashtra Interim Budget 2024: Sakal
Personal Finance

Maharashtra Interim Budget 2024: तुकोबारायांच्या अभंगाने सुरूवात करत अजित पवारांनी वारकऱ्यांसाठी केल्या 'या' ३ मोठ्या घोषणा

Maharashtra Interim Budget 2024: अजित पवार यांनी वारकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Puja Bonkile

Maharashtra Interim Budget 2024: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाने अर्थसंकल्पयी भाषणाची सुरूवात केली. अजित पवार यांनी वारकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

वारकऱ्यांसाठी केल्या मोठ्या घोषणा

महाराष्ट्रात आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. विविध भागातून दिड्या निघाल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच आज देहूमधून प्रस्थान झाले आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीहून निघेल. हजार वर्षाची परंपरा असलेल्या वारीशी वारकऱ्यांची नाळ जोडलेली आहे. याची जाणीव असल्यानं महाराष्ट्राची ओळख म्हणून पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

वारीसाठी येणाऱ्या प्रतिदिंडीला २० हजार निधी देणार आहे. वारकरी संप्रदाय मंडळ स्थापन करणार आहेत. निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यातून देहू -आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुक्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची मोफत तपासणी आणि औषधोपचार देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT