Maharashtra Labour Department issues notice to TCS over forced transfers  Sakal
Personal Finance

TCS: कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे टीसीएस संकटात; महाराष्ट्र सरकारने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

TCS: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) महाराष्ट्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नोटीस मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसला ही नोटीस पाठवली आहे.

राहुल शेळके

TCS: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) महाराष्ट्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नोटीस मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसला ही नोटीस पाठवली आहे.

पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या (NITES) तक्रारीवरून टीसीएसला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. NITES ने TCS च्या बदली पद्धतींविरोधात महाराष्ट्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार केली होती.

कामगार विभागाने कंपनीला मराठी भाषेत पाठवलेल्या नोटीसमध्ये 18 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता टीसीएस आणि विभागाचे व्यवस्थापन यांच्यात बैठक होणार असल्याचे लिहिले आहे.

NITES कडे 300 हून अधिक कर्मचाऱ्यांनी केल्या तक्रारी

NITES च्या मते टीसीएस 2 हजाराहून अधिक कर्मचार्‍यांची जबरदस्ती इतर शहरांमध्ये बदली करत असल्याच्या 300 हून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत आणि यासाठी कोणतीही सूचना किंवा कर्मचाऱ्यांचे मत विचारात घेतले नाही.

NITESच्या म्हणण्यानुसार, यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या वाढल्या आहेत. NITESचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणतात की TCS ने कर्मचाऱ्यांना धमकी दिली आहे की जर बदलीच्या सूचनांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

कंपनीच्या बदलीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारही बंद करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लोकांना बदलीचा निर्णय स्वीकारण्यास किंवा राजीनामा देण्यास भाग पाडण्याच्या कंपनीच्या कृतीचा हरप्रीत यांनी तीव्र शब्दात निषेध केला आणि ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

टीसीएसने कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची मुदत दिली होती.

TCSच्या HR विभागाने TCS मुंबईच्या कर्मचाऱ्यांना 14 दिवसांच्या आत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बदली प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते.

कंपनीने या मेलमध्ये लिहिले आहे की कर्मचारी अद्याप नवीन ठिकाणी गेलेले नाहीत आणि 14 दिवसांची टाइमलाइन उलटून गेल्याने त्यांचे पगार थांबवले जात आहेत.

याशिवाय कंपनीने आपल्या आदेशांचे उल्लंघन आणि नोकरीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT