Maharashtra leads in filing income tax returns top 5 states with nearly 50 percent total income tax returns filed  Sakal
Personal Finance

ITR Filing: देशात महाराष्ट्र नंबर 1, आयकर रिटर्न भरण्यात 'या' राज्यांचा सर्वात जास्त वाटा

ITR Filing: देशात अनेक राज्ये अशी आहेत जी आयकर रिटर्न भरण्यात आघाडीवर आहेत

राहुल शेळके

ITR Filing: देशात आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. या वर्षीही जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत करोडो करदात्यांनी कर भरला आहे. देशातील अनेक राज्ये अशी आहेत जी आयकर रिटर्न भरण्यात आघाडीवर आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये कर भरण्यात आघाडीवर आहेत.

मूल्यांकन वर्ष 2023 मध्ये भरलेल्या एकूण आयकर रिटर्नपैकी या राज्यांचा वाटा 48 टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशात कमी उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात गेलेल्या करदात्यांची संख्या लक्षणीय असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक वाढ?

मूल्यांकन वर्ष 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये 64 लाख अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. या अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि राजस्थान यांचा क्रमांक लागतो.

दुसरीकडे, वाढीच्या बाबतीत, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड सारख्या लहान राज्यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये आयटीआर फाइलिंगमध्ये 20 टक्के वाढ नोंदवली आहे.

2047 पर्यंत मध्यमवर्गीयांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, असेही एसबीआयच्या अहवालातून समोर आले आहे.

SBI ने 'Deciphering Emerging Trends in ITR Filing' नावाचा हा अहवाल देशातील उदयोन्मुख ट्रेंड आणि ITR फाइलिंगमधील बदलांबाबत प्रसिद्ध केला आहे. त्यात भारताच्या करप्रणालीतील सतत होणाऱ्या बदलांबाबत संशोधनाचा उल्लेखही करण्यात आला आहे.

6.77 कोटी आयकर रिटर्न भरले

यापूर्वी, आयकर विभागाने माहिती दिली होती की मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी विक्रमी 6.77 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत आणि 31 जुलै 2023 पर्यंत, 53.67 लाख प्रथमच आयकर रिटर्न भरणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT