LIC MF sakal
Personal Finance

LIC MF : ‘एलआयसी एमएफ’चा मॅन्युफॅक्चरिंग फंड; आजपासून करता येणार गुंतवणूक

एलआयसी म्युच्युअल फंडातर्फे ‘एलआयसी एमएफ मॅन्युफॅक्चरिंग फंड’ ही उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संकल्पनेवर आधारित एक मुदतमुक्त (ओपन-एंडेड) योजना दाखल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एलआयसी म्युच्युअल फंडातर्फे ‘एलआयसी एमएफ मॅन्युफॅक्चरिंग फंड’ ही उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संकल्पनेवर आधारित एक मुदतमुक्त (ओपन-एंडेड) योजना दाखल केली आहे. या योजनेत आजपासून गुंतवणूक करता येणार असून, ती चार ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल.

या योजनेतील युनिटचे वाटप ११ ऑक्टोबर रोजी केले जाईल. गुंतवणूकदारांना किमान पाच हजार रुपये व त्यापुढे एक रुपयाच्या पटीत रक्कम गुंतवावी लागेल. या फंडातील निधीचे व्यवस्थापन योगेश पाटील आणि महेश बेंद्रे करणार आहेत.

हा फंड ‘निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग (टोटल रिटर्न) इंडेक्स’चा मागोवा घेईल. वाहन उद्योग, औषधनिर्माण, रसायने, अभियांत्रिकी, धातूनिर्मिती, जहाज बांधणी, पेट्रोलियम इत्यादींचा समावेश असलेल्या कंपन्यांचे शेअर या योजनेत घेतले जाणार आहेत.

यावेळी एलआयसी म्युच्युअल फंडाचे एमडी आर. के. झा म्हणाले, ‘‘देशाची मजबूत ‘जीडीपी’ वाढ, वेगवान शहरीकरण, वाढती मध्यमवर्गीय लोकसंख्या, सरकारचे निर्यात प्रोत्साहन आणि उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेसारखे धोरणात्मक उपक्रम आणि ‘मेक-इन-इंडिया’ मोहिमेमुळे उत्पादित वस्तूंना मागणी वाढत आहे.

परिणामी, देश मोठ्या प्रमाणावर जगासाठी उत्पादन केंद्र म्हणून विकसित होत पुढे आले आहे. देशाला २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात उत्पादन क्षेत्राची मोठी भूमिका राहिल. परिणामी, उत्पादन क्षेत्रांतील गुंतवणुकीचा गुंतवणूकदारांना नक्कीच फायदा होऊ शकतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेम दीपाली सय्यदच्या कुटूंबातील सदस्याचं निधन ; "आम्ही तिला अजून सांगितलं नाही.." नवऱ्याचा खुलासा

Budh Vakri 2026: सावधान! बुधाच्या वक्री गतीचा कन्यासह ‘या’ राशींवर परिणाम; समस्या वाढण्याआधी करा 'हे' उपाय

Horoscop : २२ फेब्रुवारीला गुरू-पुष्य अन् सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ संयोग! 'या' ३ राशींचे नशीब फळफळेल, आर्थिक फायदे होणार

Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरण! कृष्णा आंधळे तीनदा गावात आला; जिवाला धोका, मुख्यमंत्र्यांना कळवणार धनंजय देशमुखांची माहिती

'या' बॉलिवूड अभिनेत्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेेंना खावा लागलेला मार; स्वतः सांगितलेला किस्सा, म्हणाले- त्याच्या नादाला लागलो आणि..

SCROLL FOR NEXT