Ayodhya Ram Mandir Sakal
Personal Finance

Ram Mandir: पुण्यातील मराठी उद्योजकाला अयोध्येत पुढील १५ वर्षांसाठी सेवा देण्याची मिळाली संधी

Ayodhya Ram Mandir: पुण्यातील मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीला अयोध्येतील पहिले चार मजली मल्टिलेव्हल पार्किंग चालवण्याचे काम मिळाले आहे. तसेच येथील फूडकोर्ट आणि रूफटॉप रेस्टॉरंटही चालवण्याचे कामही मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुण्यातील मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीला अयोध्येतील पहिले चार मजली मल्टिलेव्हल पार्किंग चालवण्याचे काम मिळाले आहे. तसेच येथील फूडकोर्ट आणि रूफटॉप रेस्टॉरंटही चालवण्याचे कामही मिळाले आहे.

या कामाचा कालावधी पुढील १५ वर्षांसाठी असणार आहे. देशातील अनेक कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. परंतु ‘स्मार्ट सर्विसेस’ला ही निविदा मिळाली आहे.

वाहनतळात ५०० चारचाकी गाड्या, तर एक हजार दुचाकी वाहने लावण्याची क्षमता आहे. या वाहनतळाच्या इमारतीवर रूफटॉप रेस्टॉरंट असणार आहे. त्याचप्रमाणे बाजूला सुमारे ५० हजार चौरस फुटांची मोकळी जागा असून याठिकाणी २८ फूडकोर्टचे बांधकाम सुरू आहे.

या फूडकोर्टमध्ये प्रामुख्याने मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे भाविकांना अयोध्येत मराठी खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.

गेल्या १४ वर्षांपासून सेवा

देणाऱ्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची महाराष्ट्रासह राजस्थान, तेलंगण, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही विविध कामे सुरू आहेत. नफा हा उद्देश न ठेवता श्रीरामाची सेवा यानिमित्ताने करायला मिळणार असल्याचा आनंद आहे, असे मत ‘स्मार्ट सर्व्हिसेस’चे संचालक चंद्रकांत गायकवाड यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT