Stock Market  esakal
Personal Finance

Stock Market Updates: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

Shares in Action: Get the Latest Stock Market News and Updates : जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात सावधगिरी बाळगली जात असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कमी दिसते. निफ्टीला 24,350 अंकांच्या आसपास रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे.

Sandip Kapde

गुरुवारी अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स तोट्यासह बंद झाले. निफ्टी 24,100 च्या खाली गेला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 581.79 अंकांनी अर्थात 0.73 टक्क्यांनी घसरून 78,886.22 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 180.50 अंकांच्या म्हणजेच 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 24,117.00 वर बंद झाला. जर आपण सेक्टरल इंडेक्सेसवर नजर टाकली तर फार्मा, हेल्थकेअर आणि मीडिया वगळता इतर सर्व इंडेक्स लाल रंगात बंद झाले. मेटल, रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि आयटी इंडेक्स 1-2 टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची चाल ?

मोठ्या उलथापालथीत निफ्टी 50 विकली क्लोजिंगच्या दिवशी 180.50 अंकांच्या घसरणीसह 24,117 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. सेक्टरल इंडेक्समध्ये फार्माने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तर आयटी आणि मेटलमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. मिड आणि स्मॉलकॅप्सने 0.30 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह आघाडीच्या इंडेक्सला मागे टाकले. इंडेक्स मोठ्या रेंजमध्ये चढ-उतार करत आहे. जिथे खाली 23,965 (50DMA जवळ) वर सपोर्ट दिसत आहे. तर वरच्या बाजूस 24,330 (Bearish Gap Zone) वर रझिस्टंस आहे.

जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात सावधगिरी बाळगली जात असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कमी दिसते. निफ्टीला 24,350 अंकांच्या आसपास रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. 23,900 च्या खाली ब्रेकआउट केल्यास आणखी उतार-चढाव होऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेचा सामना करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हेज्ड स्ट्रॅटेजीसह त्यांची पोझिशन्स समायोजित करण्याचा सल्ला त्यांना दिला.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • ग्रासिम (GRASIM)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • इन्फोसिस (INFY)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पेज इंडिया (PAGEIND)

मैन्युफैक्चरिंग नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT