Meta Layoffs esakal
Personal Finance

Meta Layoffs: मार्क झुकरबर्गच्या कंपनीत होणार कर्मचारी कपात, 600 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Meta Layoffs: टेक कंपन्यांनी सर्वात जास्त कर्मचार्‍यांची कपात केली आहे.

राहुल शेळके

Meta Layoffs: जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि मंदीच्या भीतीमध्ये, जगभरातील कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेक कंपन्यांनी सर्वात जास्त कर्मचार्‍यांची कपात केली आहे. याशिवाय रिअल इस्टेट, आर्थिक क्षेत्र, आरोग्यसेवा आणि ऊर्जा यासह इतर सर्व क्षेत्रांत कर्मचारी कपात करण्यात आली आहे.

यातच आता मेटा कंपनी रिअॅलिटी लॅब विभागातील नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना आधीच याबाबत माहिती दिली आहे. वृत्तानुसार बुधवारी कर्मचार्‍यांची कपात केली जाईल. लॅब विभागातील कर्मचारी कंपनीसाठी कस्टम चिपसेट बनवते.

मेटाने कर्मचारी कपातीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फेसबुक एजाइल सिलिकॉन टीममध्ये अंदाजे 600 कर्मचारी आहेत. यापैकी किती जणांची कपात केली जाईल, याचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. याआधी कंपनीने 2022 मध्ये 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीच्या महसुलात घसरण झाल्यानंतर कंपनीने कर्मचारी कपात केली होती.

सतत वाढणारी महागाई रोखण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरांबाबत कठोर निर्णय घेतले आहेत. याचा थेट परिणाम जगभरातील कंपन्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि कमाईवर झाला आहे.

महसुलात घट होत असताना, कंपन्यांनी त्यांचा खर्च कमी करण्यासाठी आणि नफा स्थिर ठेवण्यासाठी कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारला आहे.

जागतिक मंदीच्या काळात, या टेक कंपन्यांनी सर्वप्रथम कर्मचारी कपात सुरू केली कारण कोरोना काळात त्यांनी मोठ्या पगारावर जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली होती.

तज्ञांनी सांगितले की परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. त्यामुळे कंपन्या आणखी कर्मचारी कपात करू शकतात. याचा परिणाम भारतावरही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT