MGNREGA Scheme Work demand under rural jobs scheme rises  sakal
Personal Finance

MGNREGA Scheme: अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा! काम शोधणाऱ्यांची संख्या वाढली

MGNREGA Scheme: देशातील रोजगाराबाबत चिंता वाढली आहे.

राहुल शेळके

MGNREGA Scheme: सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या मनरेगा या प्रमुख ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार शोधणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2024 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मनरेगा अंतर्गत कामाच्या मागणीत वाढ झाली आहे.

अशा स्थितीत आगामी काळात औद्योगिक सुधारणा होण्याच्या आशांना मोठा धक्का बसला असून देशातील रोजगाराबाबत चिंता वाढली आहे.

तज्ज्ञांच्या मते 2024 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात मनरेगाची वाढती मागणी हे अर्थव्यवस्थेसाठी वाईट लक्षण आहे. खेड्यापाड्यात मनरेगा अंतर्गत काम मागणाऱ्यांची संख्या वाढल्याने शहरातील मजुरांची मागणी कमी झाल्याचे दिसून येते.

सामान्यतः ग्रामीण भागातील मजूर शहरांतील कारखान्यांमध्ये काम करतात. अशा परिस्थितीत, हे आकडे दर्शवतात की गेल्या सहा महिन्यांत कारखान्यांमधील काम मंदावले आहे, जे अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही.

यासोबतच यंदा मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कृषी क्षेत्रातील मजुरांची मागणीही कमी झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या जुलैपर्यंत देशाच्या औद्योगिक उत्पादनात 4.8 टक्के वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 10 टक्के कमी आहे.

मनरेगा अंतर्गत अनेकांना रोजगार मिळाला

एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मनरेगा अंतर्गत रोजगार शोधणाऱ्या लोकांच्या संख्येत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या योजनेत एकूण 19.2 कोटी लोकांनी काम केले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.6 टक्के अधिक आहे.

पहिल्या तिमाहीबद्दल बोलायचे झाल्यास, 15 कोटींहून अधिक लोकांनी मनरेगा अंतर्गत काम मागितले होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.5 टक्के जास्त होते.

मनरेगा योजना काय आहे?

मनरेगा योजना 2005 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याद्वारे सुरू करण्यात आली. या योजनेच्या मदतीने ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस मजुरीच्या रोजगाराची हमी दिली जाते.

या योजनेअंतर्गत किमान एक तृतीयांश नोकऱ्या महिलांना दिल्या जातात. ग्रामीण भागातील गरीब आणि स्थलांतरित कामगारांसाठी ही एक महत्त्वाची संरक्षण योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT