एचडीएफसी बँकेकडून बोनस शेअर देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत आहे. यामुळे एचडीएफसीचे शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर यामुळे शेअर बाजारातही खळबळ उडालीय. दरम्यान, एका फंड मॅनेजरनं त्याच्या स्मार्ट गुंतणुकीबाबत केलेला खुलासा चर्चेत आलाय. कम्प्लीट सर्कल वेल्थचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर असणारे गुरमीत चड्ढा गेल्या १५ वर्षांपासून दर महिन्याला एडचीएफसी बँकेचे १० शेअर खरेदी करत आहेत. बाजारात एचडीएफसीचे शेअर कोसळलेले असोत किंवा किंमत वाढलेली असो, त्यांनी फक्त खरेदी करणं कायम ठेवलं. यामुळे त्यांची गुंतवणूक कोट्यवधींवर गेलीय.
गुरमीत चड्ढा यांनी सोशल मीडियावर स्वत:च पोस्ट केली असून त्यात म्हटलं की, १५ वर्षांपासून दर महिन्याला एकदाही खंड पडू न देता १० शेअर खरेदी केले. बाजारात तेजी असो किंवा मंदी, इतर काहीही झालं तरी १० शेअर खरेदी करायचं थांबवलं नाही. इतकंच नाही तर बाजारात मोठी घसरण झाली तेव्हा संधी समजून जास्त शेअर खरेदी केले.
एचडीएफसी बँकेचे २५ हजार शेअर खरेदी करणं हे टार्गेट आहे. पण हे फक्त शेअर्सपुरतं नाहीय. मी १० किंवा २० टक्के रिटर्नकडे लक्ष दिलं नाही तर माझं ध्येय हे १०-२० वर्षात १० ते २० पट परतावा मिळवणं हा आहे. हाच दीर्घ गुंतवणुकीचा खरा खेळ असल्याचंही गुरमीत चड्ढा यांनी म्हटलंय.
चड्ढा यांनी एक जुनी पण नकोशी आठवण शेअर केली. २०२० मध्ये त्यांनी सांगितलं होतं की, २००६ मध्ये एचडीएफसी बँकेत नोकरी करत होतो. त्यावेळी जास्त पगाराची दुसरी संधी मिळाल्यानं नोकरी सोडली. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी असणारा शेअर्सचा पर्याय निवडला नाही.
चार वर्षांनी आपली चूक गुरमीत यांच्या लक्षात आली. त्यांचा जो सहकारी बँकेत काम करत होता त्यानं कर्मचारी शेअर्स पर्यायातून १५ कोटींची कमाई केली होती. यानंतर चड्ढा यांनी दर महिन्याला एचडीएफसीचे १० शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
गुरमीत यांनी एचडीएफसीच्या शेअर्सची किंमत १८० रुपये असताना खरेदी करण्यास सुरुवात केली. आज या बँकेच्या शेअर्सची किंमत २ हजार रुपये इतकी झालीय. दोन स्टॉक स्प्लीट्सनंतर आज त्यांच्याकही जवळपास ६५०० शेअर्स असावेत. या शेअर्सची किंमत आजच्या बाजारभावानुसार १ कोटी ३० लाखांपर्यंत आहे. गुंतवणुकीतून झटपट कमाईच्या लोभापासून वाचलं पाहिजे. दर महिन्याला दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार तुम्हाला कित्येक पटीने फायदा मिळवून देऊ शकतो हेच गुरमीत चड्ढा यांच्याकडून शिकता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.