modi government take decision to private one more government company Indian Medicines Pharmaceutical Corporation Limited  Sakal
Personal Finance

Privatisation News: मोदी सरकारचा मोठा निर्णय! आणखी एक सरकारी कंपनी विकणार; मॅनकाइंड आणि बैद्यनाथ...

Privatisation News: आणखी एका कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

राहुल शेळके

Privatisation News: आणखी एका कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने गेल्या वर्षीच नियोजन केले होते. सरकार आपल्या मालकीची आयुर्वेद कंपनी इंडियन मेडिसिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनला (IMPCL) विकत आहे.

मॅनकाइंड फार्मा आणि बैद्यनाथ आयुर्वेद यांनी या सरकारी कंपनीतील 100% हिस्सा खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (लेटर ऑफ इंटरेस्ट किंवा EoI) सबमिट केले आहेत. असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

पतंजली आयुर्वेदाने सरकारी कंपनीसाठी बोली प्रक्रियेत भाग घेणे अपेक्षित होते. पण पतंजली आयुर्वेदाने एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करण्यास नकार दिला आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी ट्विट केले होते की, इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन (IMPCL) च्या निर्गुंतवणुकीसाठी अनेक EoI प्राप्त झाले आहेत.

कंपनीचा महसूल 250 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2022 मध्ये, सरकारी औषध इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन (IMPCL) चा महसूल 250 कोटी रुपये होता आणि नफ्याचे प्रमाण सुमारे 25 टक्के होते. ही सरकारी कंपनी 1978 साली सुरू झाली. ही कंपनी केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत चालणाऱ्या दवाखाने आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करते.

कंपनी सध्या 656 आयुर्वेदिक औषधे तयार करते. कंपनी राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत सर्व राज्यांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करते. याशिवाय कंपनी 6000 जन औषधी केंद्रांना औषधांचा पुरवठा करते. ही कंपनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT