MGNREGA Wage Rates Hike Sakal
Personal Finance

MGNREGA Wage: निवडणुकीपूर्वी कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट; मनरेगाच्या मजुरीत केली वाढ, काय आहेत नवे दर?

MGNREGA Wage Rates Hike: 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या मजुरीच्या दरात 3 ते 10 टक्के वाढ केली आहे.

राहुल शेळके

MGNREGA Wage Rates Hike: 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या मजुरीच्या दरात 3 ते 10 टक्के वाढ केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी (28 मार्च) जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढलेले वेतन दर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आहेत. मनरेगा कामगारांसाठी 1 एप्रिल 2024 पासून नवीन मजुरी दर लागू होतील.

नव्या दरांनुसार आता प्रत्येक राज्यातील कामगारांना जास्त वेतन मिळणार आहे. गोव्यात मजुरीच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. गोव्यात सर्वाधिक 10.56 टक्के वाढ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात केवळ 3.04 टक्के वाढ झाली आहे.

नवे दर काय आहेत?

  • गोव्यातील कामगारांना पूर्वी 322 रुपये प्रतिदिन मिळत होते, ते आता वाढून 356 रुपये झाले आहे.

  • कर्नाटकात मनरेगाचा दर 349 रुपये झाला आहे, जो पूर्वी 316 रुपये प्रतिदिन होता.

  • मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मनरेगा कामगारांचा मजुरी दर 221 रुपयांवरून 243 रुपये प्रतिदिन झाला आहे.

  • उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मजुरांची रोजची मजुरी 230 रुपयांवरून 237 रुपये झाली आहे.

  • हरियाणा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मनरेगा कामगारांचे दर 7 टक्क्यांनी वाढले आहेत. आता त्यांची रोजची मजुरी 267.32  रुपयांवरून 285.47 रुपये झाली आहे.

बिझनेस स्टँडर्डने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने कामगार दर अधिसूचित करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात आचारसंहिता लागू आहे. आयोगाकडून हिरवा सिग्नल मिळाल्यावर मंत्रालयाने तत्काळ वाढीव वेतनाबाबत अधिसूचना जारी केली.

मनरेगा योजना काय आहे?

मनरेगा कार्यक्रम 2005 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. ही जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना आहे असे मानले जाते. या योजनेअंतर्गत, सरकारने किमान वेतन निश्चित केले आहे ज्यावर ग्रामीण भागातील लोकांना कामावर घेतले जाते.

मनरेगा अंतर्गत करण्यात आलेली कामे अकुशल असून त्यात खड्डे बुजवण्यापासून ते नाले तयार करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात 100 दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Mobile Price Hike : 10 हजारांचा स्मार्टफोन आता 20 हजारला? मोबाईल कंपन्यांचा 'तो' सिक्रेट खेळ, जो हळू हळू रिकामा करतोय तुमचा खिसा

Bakri Eid: बकऱ्याचा अजब 'डाएट प्लॅन'! रोज २५० ग्रॅम चिकन आणि कोल्ड्रिंक; AC त राहणाऱ्या काश्मिरी बकऱ्याची गोष्ट

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

SCROLL FOR NEXT