Moody's retains India 2023 growth at 6.7 percent on strong domestic demand  Esakal
Personal Finance

India GDP: सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने भारताचा जीडीपी वाढेल, मूडीजने व्यक्त केला अंदाज

India GDP: 2023 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

राहुल शेळके

India Economic Growth: जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजच्या मते, भारताच्या आर्थिक आकडेवारीवरून असे दिसून येते की दुसऱ्या तिमाहीतही विकासाचा वेग कायम राहणार आहे.

2023 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2024 मध्येही विकास दर 6.1 टक्के राहील. रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज जाहीर केला आहे.

देशांतर्गत मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था पुढे जात असल्याचे मूडीजने म्हटले आहे. मूडीजने असेही म्हटले आहे की भारताच्या ग्रामीण मागणीत सुधारणेची चिन्हे आहेत.

ग्रामीण भागातील मागणी

मूडीजच्या मते, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन, वाढती वाहन विक्री, ग्राहकांचा वाढता विश्वास आणि कर्जाची दुहेरी अंकी वाढ हे दर्शविते की सध्याच्या सणासुदीच्या हंगामात आर्थिक वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील मागणी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र कमी पावसामुळे मागणीत घसरण होऊ शकते. यामुळे पीक उत्पादन आणि कृषी उत्पन्न कमी होऊ शकते.

मूडीजने सांगितले की महागाई देखील ऑगस्टमधील 4.8 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, परंतु हवामान आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे महागाई वाढीचा धोका निर्माण झाला आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदरात वाढ करत आहेत, परंतु भारतात देशांतर्गत मागणीमुळे, आर्थिक वाढीचे चाक वेगाने पुढे जात आहे, असे मूडीजने म्हटले आहे.

मूडीजने जारी केलेल्या अहवालानुसार, भारताच्या विकासाचा वेग कायम राहील आणि 2023 मध्ये अर्थव्यवस्था 6.7% च्या वेगाने वाढेल, तर आर्थिक विकासाचा वेग 2024 मध्ये 6.1% असेल आणि 2025 मध्ये तो 6.3% गाठेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Audit For Shendapark Hospital : शेंडापार्कमधील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाचे होणार 'आयआयटी' ऑडिट! मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा निर्णय, बिले रोखली

आशिकीनंतर पुन्हा प्रेमकथेत आदित्य रॉय कपूर! आदित्य रॉय कपूरच्या नव्या चित्रपटाची घोषणा; रोमान्स, अ‍ॅक्शन आणि संगीताचा तिहेरी धमाका

Latest Marathi News Update : पुण्यातील सदाशिव पेठेत मध्यरात्री दुकानाला आग

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Solapur: मंगळवेढा वगळून नदीकाठी पाच तासाचा वीज पुरवठा जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने शेतकऱ्यात संताप

SCROLL FOR NEXT