More than 100 startup companies Layoff 15,000 employees  Sakal
Personal Finance

Layoff: १००हून अधिक स्टार्टअप कंपन्यांनी १५ हजार कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Layoff: जगातील एक महत्त्वाचे स्टार्टअप केंद्र म्हणून भारताने ओळख मिळविली आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे देशातील १००हून अधिक स्टार्टअप कंपन्यांनी यंदा १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.

राहुल शेळके

नवी दिल्ली, ता. २१ ः जगातील एक महत्त्वाचे स्टार्टअप केंद्र म्हणून भारताने ओळख मिळविली आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे देशातील १००हून अधिक स्टार्टअप कंपन्यांनी यंदा १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.

‘लेऑफ डॉट एफवायआय’ कंपनीच्या अहवालानुसार, रोख भांडवलाची टंचाई निर्माण झाल्याने अडचणीत असलेल्या बायजूजने यावर्षी दुसऱ्या फेरीत अडीच हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले.

या वर्षी शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणाऱ्या स्टार्टअपमध्ये ओला, कॅप्टन फ्रेश, शेअरचॅट आदींचा समावेश आहे, तर स्विगी, मेडीबडी, डिलशेअर, मायगेट, पॉलिगॉन, सॅपलॅब्स, अपग्राड, डंझो, झेस्ट मनी, सिम्पल, मीशो, क्युमॅथ, मिल्कबास्केट आदी अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी केले आहेत.

जागतिक स्तरावर ११६० हून अधिक कंपन्यांनी यावर्षी २६ लाख दोन हजार २३८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या वर्षी १०६४ कंपन्यांनी एक लाख ६४ हजार ९६९ कर्मचाऱ्यांना कमी केले होते. निधीची कमतरता जाणवू लागल्याने, स्टार्टअपनी खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कमी करण्याची भूमिका घेतली आहे.

‘ग्लोबलडेटा’च्या अहवालानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतीय स्टार्टअपना मिळालेल्या निधीमध्ये ६५.८ टक्के घसरण झाली आहे. या वर्षी, भारतीय स्टार्टअपनी १०१३ व्हेंचर कॅपिटलकडून ६.९ अब्ज डॉलर उभे केले.

गेल्या वर्षी, भारतीय स्टार्टअपनी केवळ चार महिन्यांत १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक निधी मिळविला होता. भारतातील युनिकॉर्न स्टार्टअपची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. २०२२ मध्ये २४ युनिकॉर्न कंपन्या होत्या. या वर्षी फक्त दोनच कंपन्यां आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT