Mukesh Ambani gets third death threat, sender demands rs 400 crore ransom  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकी, 200 कोटीनंतर आता 400 कोटींची मागणी

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आला आहे.

राहुल शेळके

Mukesh Ambani: उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आला आहे. ही धमकी त्याच अज्ञात व्यक्तीने दिली आहे ज्याने 27 ऑक्टोबर रोजी दोन ईमेल पाठवून 200 कोटी रुपयांची मागणी केली होती.

तिसर्‍या ईमेलमध्ये, त्या व्यक्तीने खंडणीची रक्कम वाढवून 400 कोटी रुपये केली आहे कारण अंबानींनी त्यांच्या मागील दोन ईमेलला उत्तर दिले नव्हते.

या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सोमवारी अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे.

पहिला धमकीचा ईमेल 26 ऑक्टोबरला आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्याची किंमत 200 कोटी रुपये करण्यात आली. पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही धमकीच्या मेलमध्ये म्हणले आहे.

अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेल्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, ''तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत 400 कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत.''

गेल्या वर्षीही मिळाली होती धमकी

मुकेश अंबानींना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून धमकीचे कॉल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. आरोपींनी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT