Mukesh Ambani
Mukesh Ambani  sakal
Personal Finance

Mukesh Ambani : मुकेश अंबानींचा समावेश पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये ; सर्जी ब्रेनला मागे टाकून मिळवले दहावे स्थान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फोर्ब्स मासिकाने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. मुकेश अंबानी यांनी या यादीत दहावे स्थान मिळवले असून, त्यांची एकूण संपत्ती ९.४५ लाख कोटी रुपये (११४ अब्ज डॉलर) आहे. अंबानी यांनी सर्जी ब्रेनला मागे टाकून हे स्थान मिळवले आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १६ व्या स्थानावर आहेत.

या यादीत फ्रेंच अब्जाधीश ‘लुई व्हिटॉन’चे सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती सध्या १८.६० लाख कोटी रुपये आहे, तर ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती १६.७४ लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर या यादीत अनुक्रमे जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग, लॅरी एलिसन, वॉरेन बफेट, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मर, लॅरी पेज यांचा क्रमांक लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT