Mukesh Ambani  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani Update : मुकेश अंबानी देणार फोन पे आणि पेटीएम ला टक्कर, काय आहे नवा प्लॅन?

Mukesh Ambani: रिलायन्स सध्या काही स्टोअरमध्ये साउंड बॉक्सची चाचणी करत आहे.

राहुल शेळके

Relience Industries News : तुम्ही दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जाता तेव्हा, दुकानदाराजवळ तुम्ही पेटीएम किंवा फोनपेचे लहान आकाराचे स्पीकर अनेकदा पाहिले असेल. हा एक छोटासा साउंडबॉक्स आहे जो दुकानदाराला पेमेंट केल्यावर पैसे मिळाल्याची माहिती देतो.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार रिलायन्स पेटीएम आणि फोन पेच्या या छोट्या साऊंडबॉक्सला आव्हान देण्याची तयारी करत आहे. अलीकडील अहवालात असे समोर आले आहे की रिलायन्स सध्या त्यांच्या काही स्टोअरमध्ये साउंड बॉक्सची चाचणी करत आहे.

रिलायन्स कोणतीही नवीन गोष्ट सार्वजनिकरित्या लॉन्च करण्यापूर्वी स्टाफला डिव्हाइस देऊन अंतर्गत चाचणी करते. रिलायन्सचे हे नवीन डिव्हाइस किधी लॉन्च करेल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जोपर्यंत अंतर्गत चाचणीचे निकाल आणि फीडबॅक समोर येत नाही, तोपर्यंत कंपनी हे उपकरण बाजारात आणण्यासाठी कोणतीही मोठी घोषणा करणार नाही.

साउंडबॉक्स म्हणजे काय?

या छोट्या साउंड बॉक्समध्ये एक स्पीकर (4 W) देण्यात आला आहे आणि हे उपकरण ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. कोणताही ग्राहक कोणत्याही व्यापाऱ्याला पेमेंट करताच, हा बॉक्स प्राप्त झालेल्या पेमेंटची माहिती देण्याचे काम करतो, ज्यामुळे फोन पुन्हा पुन्हा तपासण्याची गरज नाही.

पेटीएम साउंडबॉक्सची वैशिष्ट्ये

पेटीएम हे साउंड बॉक्स उपकरण बाजारात आणणारे पहिले प्लॅटफॉर्म होते. पेटीएमचा साउंड बॉक्सला 7 दिवसांची बॅटरी लाइफ आहे आणि 11 प्रादेशिक भाषांना तो सपोर्ट करतो.

आता रिलायन्स साउंड बॉक्समध्ये कोणते फिचर्स दिले आहेत आणि या उपकरणाची किंमत किती असेल? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT