Mukesh Ambani Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: मुकेश अंबानी खरेदी करणार आलिया भट्टची कंपनी, 350 कोटींमध्ये होणार डील?

कंपनीसाठी मुकेश अंबानी आलिया भट्टला 300 ते 350 कोटी रुपये देऊ शकतात.

राहुल शेळके

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची कंपनी लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची कंपनी अड-ए-मम्मा खरेदी करू शकते. या कंपनीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या कंपनीसाठी मुकेश अंबानी आलिया भट्टला 300 ते 350 कोटी रुपये देऊ शकतात.

येत्या 10 दिवसांत हा करार निश्चित होण्याची शक्यता आहे. या करारानंतर रिलायन्स रिटेलमध्ये चाइल्ड अपेरल पोर्टफोलिओ वाढेल.

आलियाची कंपनी रिलायन्स खरेदी करणार

रिलायन्स ब्रँड्स अभिनेत्री आलिया भट्टचा मुलांचा पोशाख ब्रँड अॅड-ए-मम्मा 300-350 कोटी रुपयांना पूर्णपणे विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

रिलायन्स ब्रँड्स ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी आहे, जी समूहाच्या रिटेल व्यवसायाची होल्डिंग कंपनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Add-e-Mamma हा ब्रँड 150 कोटींहून अधिक किंमतीचा आहे आणि तो मुख्यतः ऑनलाइन विकला जातो.

4 ते 12 वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन हा ब्रँड सुरू करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, मुलांसाठी कपडे, स्लीपसूट आणि मुलींसाठी बॉडीसूट कपडे देखील लॉन्च केले होते.

अॅड-ए-मम्माच्या पुढील 2-3 वर्षांच्या नियोजनाबाबत, आलिया भट्टने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीटीआयला सांगितले होते की, मला मुलांच्या कपड्याच्या ब्रँडचा आणखी विस्तार करायचा आहे.

सध्या, रिलायन्स ब्रँड्सने अरमानी एक्सचेंज, बर्बेरी, बॅली, बोटेगा वेनेटा, कॅनाली, डिझेल, ड्यूने, हॅम्लेज, एम्पोरियो अरमानी यांसारख्या लक्झरी, ब्रिज-टू-लक्झरी, हाय प्रीमियम आणि हाय स्ट्रीट लाईफस्टाइल सेगमेंटमध्ये अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे.

रिलायन्स किरकोळ व्यवसायाचा विस्तार करत आहे

मुकेश अंबानी यांनी अलीकडेच रिटेल क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याचा मानस व्यक्त केला होता. या दिशेने त्यांची कंपनी रिलायन्स सतत नवीन कंपन्या खरेदी करत आहे.

काही महिन्यांपूर्वी रिलायन्सने लोटस चॉकलेट कंपनी खरेदी करून रिटेल सेगमेंटचा आणखी विस्तार केला. आता ती किड्स वेअर कॅटेगरीतही तिची उपस्थिती मजबूत करण्यासाठी Add-e-Mamma खरेदी करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT