Mukesh Ambani's son Anant Ambani donates over Rs 50000000 to two famous temples Sakal
Personal Finance

Anant Ambani: दानशूर अनंत अंबानी! रामनवमीला 'या' दोन मंदिरांना दान केले 5,00,00,000 रुपये

Anant Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब अनेकदा मंदिरात दान करताना दिसतात. आता मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

राहुल शेळके

Anant Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब अनेकदा मंदिरात दान करताना दिसतात. आता मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अनंत अंबानी 16 एप्रिल 2024 रोजी 12व्या शतकातील जगन्नाथ मंदिरात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानी येथे मोठी रक्कम दान केली आहे, त्यानुसार अनंतने मंदिरासाठी 5 कोटी रुपये दान केले आहेत.

ओडिशातील जगन्नाथ मंदिर आणि आसाममधील मां कामाख्या मंदिरात प्रत्येकी 2.51 कोटी रुपये दान केले आहेत. अनंत अंबानीने आसाममधील कामाख्या मंदिराला भेट दिली. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.

माँ बगलामुखी मंदिरातून अनंतचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात तो पितांबराचे दर्शन घेताना दिसत आहे. दतिया पीठावर पोहोचल्यावर जिल्हाधिकारी संदीप कुमार यांनी त्याचे स्वागत केले. अनंतने सुमारे दोन तास मंदिरात वेळ घालवला.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी बगलामुखी मंदिरात येतात. कालही मंदिरात खूप गर्दी होती. अशा स्थितीत कडेकोट बंदोबस्तात अनंत अंबानीने माँ बगलामुखी मंदिरात दर्शन घेतले.

अनंत अंबानी अलीकडे त्याच्या प्री-वेडिंगमुळे चर्चेत आला होता. तो राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. गेल्या महिन्यातच त्यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला, ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते.

जामनगरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबानी कुटुंबाने त्यांच्या गावातील सुमारे 50 हजार लोकांसाठी अन्नदानाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT