Most Expensive Cities In India Sakal
Personal Finance

Most Expensive Cities: मुंबई भारतातील सर्वात महागडे शहर; पुणे कोणत्या नंबरवर? पहा संपूर्ण यादी

Most Expensive Cities In India: भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वात महागड्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार मुंबईचा क्रमांक 136वा आहे.

राहुल शेळके

Most Expensive Cities In India: भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वात महागड्या शहरांच्या यादीत आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार मुंबईचा क्रमांक 136वा आहे. मर्सरच्या 2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार मुंबई शहर हे भारतात राहण्यासाठी सर्वात महागडे शहर आहे. मुंबईनंतर दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

सर्वेक्षणानुसार, इतर शहरांतून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई शहर जास्त महाग आहे. मुंबईत वीज, उपयुक्तता, वाहतूक आणि घर भाड्याने घेणे खूप महाग आहे. महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने यंदा 11 स्थानांनी झेप घेतली आहे. जगातील पहिल्या 100 महागड्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश नाही. जागतिक स्तरावर या सर्वेक्षणात पहिल्या 100 शहरांच्या मानांकनात कोणताही बदल झालेला नाही. हाँगकाँग अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतातील सर्वात महागडे शहर कोणते?

  • मुंबई

  • नवी दिल्ली

  • चेन्नई

  • बेंगळुरू

  • हैदराबाद

  • पुणे

  • कोलकाता

जगातील सर्वात महागडे शहर कोणते?

  • हाँगकाँग

  • सिंगापूर

  • झ्युरिक 

  • जिनिव्हा

  • बेसल

  • बर्न

  • न्यूयॉर्क सिटी

  • लंडन

मुंबई जगात 136 व्या स्थानावर

मर्सरच्या 2024 च्या राहणीमान खर्चाच्या अहवालानुसार, मुंबई जागतिक स्तरावर 11 स्थानांनी वाढून 136 व्या स्थानावर पोहोचली आहे. 4 स्थानांच्या वाढीसह नवी दिल्ली (164), 5 स्थानांच्या घसरणीसह चेन्नई (189), 6 स्थानांच्या घसरणीसह बेंगळुरू (195), स्थिरतेसह हैदराबाद (202), 8 स्थानांच्या वाढीसह पुणे (205), 4 स्थानांच्या वाढीसह कोलकाता (207) क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT