Personal Finance

Luxury Housing Price: जगभरात आलिशान घरांच्या किंमतीत वाढ; टॉप 5 शहरांमध्ये मुंबईचा समावेश

Luxury Housing Price: जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीत आलिशान घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Luxury Housing Price: मुंबई हे स्वप्नांचे शहर मानले जाते, मात्र या शहरात घर घेणे सोपे नाही. नाइट फ्रँक इंडियाने जगातील आलिशान शहरांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाद्वारे भारतातील कोणते शहर सर्वात महाग आहे हे सांगण्यात आले आहे. या अहवालात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.

जगभरातील आलिशान घरांच्या वाढत्या किंमती पाहता टॉप-5 शहरांच्या यादीत भारतीय शहरांची नावे आहेत. या शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश आहे. नाइट फ्रँकने जगातील अशा 46 शहरांची यादी जाहीर केली आहे जिथे जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीत आलिशान घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, आलिशान घरांच्या किंमती वाढण्याच्या बाबतीत मुंबई जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मुंबई 22 व्या स्थानावर होती. या वर्षी मुंबईतील आलिशान घरांच्या किंमती 6.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुंबईशिवाय देशातील इतरही अनेक शहरे आहेत जिथे आलिशान घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

'या' शहरांमध्येही घरांच्या किंमती वाढल्या

मुंबई व्यतिरिक्त राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्येही आलिशान घरांच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर भागात आलिशान घरांच्या किंमतीत 4.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

नाइट फ्रँक इंडियाच्या यादीत ते दहाव्या क्रमांकावर आहे. तर गेल्या वर्षी दिल्ली या यादीत 36 व्या क्रमांकावर होती. बेंगळुरू हे आलिशान घरांच्या किंमतीत 2.2% वाढ झाली आहे. यावर्षी बेंगळुरू या यादीत 17 व्या क्रमांकावर आहे.

फिलीपिन्सची राजधानी मनिला या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. येथे आलिशान घरांच्या किंमतीत 21.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर या यादीत दुबई 15.9 टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

शांघायमधील आलिशान घरांच्या किंमती गेल्या एका वर्षात 10.40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या यादीत स्पेनची राजधानी माद्रिदचेही नाव समाविष्ट असून येथील आलिशान घरांच्या किंमतीत 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT