Muthoot Finance  sakal
Personal Finance

Muthoot Finance : देशातील विश्वासार्ह ब्रँडमध्ये ‘मुथूट फायनान्स’ अव्वल ; सलग आठव्या वर्षी स्थान कायम

बिगर बँकिंग कंपनी मुथूट फायनान्सने टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट अहवालानुसार, सलग आठव्या वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचा विश्वासार्ह वित्तीय सेवा ब्रँड म्हणून स्थान कायम राखले आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिल्ली : बिगर बँकिंग कंपनी मुथूट फायनान्सने टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट अहवालानुसार, सलग आठव्या वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाचा विश्वासार्ह वित्तीय सेवा ब्रँड म्हणून स्थान कायम राखले आहे. मुथूट फायनान्सच्या ग्राहक केंद्रीत आणि सेवा वितरणातील उत्कृष्टतेचे हे प्रतीक आहे. ‘टीआरए’ने देशातील सर्वोत्तम एक हजार विश्वसनीय ब्रँडची यादी जाहीर केली आहे.

गेल्या काही वर्षांत, मुथूट फायनान्सने देशात ६३०० हून अधिक शाखांद्वारे देशभरात आपला व्यवसाय विस्तारला आहे. कंपनी दररोज सरासरी २.५ लाख ग्राहकांना सहजसुलभ सोने तारण कर्ज सेवा देते. स्थापनेपासून, ७२ कोटींहून अधिक ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजा कंपनीने पूर्ण केल्या आहेत, यात पुन्हा पुन्हा आपल्या आर्थिक गरजांसाठी कंपनीकडे येणाऱ्या ग्राहकांचाही समावेश आहे.

कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर जॉर्ज मुथूट म्हणाले, ‘‘देशातील पहिल्या क्रमांकाचा विश्वासार्ह वित्तीय सेवा ब्रँड म्हणून २०१६ पासून सलग आठ वर्षे मिळालेले स्थान हे कंपनीवरील ग्राहकांच्या अतूट विश्वासाचे प्रतीक आहे. मुथूट फायनान्सची नैतिकता, विश्वासार्हता, सचोटी ही मूलभूत तत्त्वे आहेत. लाखो भारतीयांसाठी आर्थिक समावेशन सुविधा देण्याच्या आमच्या प्रवासात आम्ही त्यांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

Diwali Party Snack Recipe: दिवाळीत चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा कुरकुरीत चणा चिली, लगेच नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

SCROLL FOR NEXT