Mutual Fund Investor Sakal
Personal Finance

Mutual Fund Investor: म्युच्युअल फंडातून पैसे कधी काढायचे? काय आहे तज्ञांचा सल्ला?

Mutual Fund Investor: कधीकधी म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूक योजनेत बदल करतात.

राहुल शेळके

Mutual Fund Investor: तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी. दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.

जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही त्याच्या व्याजातून चांगला परतावा मिळवू शकता. तुम्ही तुमच्या फोनवरून देखील म्युच्युअल फंड मॅनेज करू शकता.

बर्‍याच तज्ञांचे असेही म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही नोकरी सुरू करता तेव्हा त्यासोबत म्युच्युअल फंडांमध्येही गुंतवणूक करायला सुरुवात करावी. लोकांनी या योजनेत गुंतवणूक करावी जिथे त्यांना चांगला परतावा मिळेल.

तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर फंडातून पैसे काढण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक केली आहे त्या फंडातून तुम्हाला चांगला परतावा मिळत नसेल तर तुम्ही फंडातून पैसे काढून दुसऱ्या फंडात गुंतवावेत.

म्युच्युअल फंड योजनेत बदल

कधीकधी म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूक योजनेत बदल करतात. जर तुमच्या कंपनीनेही प्लॅन बदलला असेल, तर तुम्ही एकदा तपासा की कंपनीतील बदल तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यात मदत करतात का?

तुमचे ध्येय पूर्ण होत नसेल तर तुम्ही फंडातून पैसे काढावेत. ज्यासाठी तुम्ही फंडात गुंतवणूक केली आहे ते उद्दिष्ट पूर्ण होत नसेल, तर तुम्ही फंडातून पैसे काढावेत.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT