Ramdev Baba sakal
Personal Finance

Ramdev Baba : रामदेव बाबा यांचा अदानी-अंबानींना टोला; म्हणाले, अब्जाधीशांनी घालवलेल्या...

आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

सकाळ डिजिटल टीम

Ramdev Baba News : योगगुरू रामदेव यांनी रविवारी सांगितले की, कॉर्पोरेट 99 टक्के वेळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, तर संताचा काळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. अंबानी आणि अदानी यांसारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा तीन दिवसांचा इथला मुक्काम अधिक मौल्यवान असल्याचेही ते म्हणाले.

रामदेव त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.

रामदेव बाबा म्हणाले की, “मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यापेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेट्स त्यांचा 99% वेळ स्वतःच्या हितासाठी वापरतात, तर संतांचा वेळ सर्वांच्या फायद्यासाठी असतो.''

पतंजलीसारखी साम्राज्ये निर्माण झाली पाहिजेत :

या आर्थिक वर्षात पतंजलीला 40,000 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनवल्याबद्दल त्यांनी बालकृष्णाचे कौतुक केले. ते म्हणाले की ''भारताला 'गौरवशाली' बनवायचे असेल तर पतंजलीसारखी साम्राज्ये निर्माण करावी लागतील.''

रामदेव बाबा पुढे म्हणालेकी, “कर्करोग खूप पसरला आहे. कोरोना महामारीनंतर या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. लोकांची दृष्टी, ऐकण्याची क्षमता गमावली आहे.”

या महिन्याच्या सुरुवातीला, रामदेव यांनी राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या संतांच्या सभेत मुस्लिमांवर दहशतवाद आणि हिंदू महिलांवर आरोप लावले. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

SCROLL FOR NEXT