neft rtgs imps money transfer Facilitates large financial transactions sakal
Personal Finance

मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी सुविधा

दैनंदिन व्यवहारातील किरकोळ पेमेंट करण्यासाठी भीम, गुगलपे, फोनपे यासारखी मोबाईल अॅप वापरणे आता सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडले

सकाळ वृत्तसेवा

दैनंदिन व्यवहारातील किरकोळ पेमेंट करण्यासाठी भीम, गुगलपे, फोनपे यासारखी मोबाईल अॅप वापरणे आता सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र, मोठ्या रकमांचे हस्तांतर करायचे असेल, तर या ॲपचा उपयोग होत नाही. अशावेळी ‘एनईएफटी’ ‘आरटीजीएस’, ‘आयएमपीएस’ हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.

नेमका कोणता पर्याय कोणत्यावेळी वापरणे योग्य आहे, याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. त्यासाठी योग्य पर्याय निवडणे सोपे व्हावे याकरिता या तीनही पर्यायांची तुलना करून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.

तुलनात्मक बाबी - एनईएफटी - आरटीजीएस - आयएमपीएस

पेमेंटची पद्धत - ऑनलाइन /ऑफलाइन - ऑनलाइन /ऑफलाइन - फक्त ऑनलाइन

किमान रक्कम - रु.१ - रु.२ लाख - रु.१

कमाल रक्कम - मर्यादा नाही - मर्यादा नाही - रु.२ लाख

व्यवहारपूर्तीचा कालावधी - प्रत्येक अर्ध्या तासाने - लगेचच - लगेचच

पेमेंट कधी करता येते - कधीही, - सुट्टीच्या दिवशीसुद्धा

३६५ दिवस अखंड २४ तास बँक कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४.३० पर्यंत कधीही, सुट्टीच्या दिवशीसुद्धा

३६५ दिवस अखंड २४ तास सेवाशुल्क बँकेनुसार कमी अधिक असू शकते.

सोबतच्या तक्त्यावरून आपल्या असे लक्षात येईल, की तातडीने पेमेंट करावयाचे असेल, तर ‘आरटीजीएस’ हा योग्य पर्याय आहे, मात्र पेमेंट किमान दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.

तातडीच्या पेमेंटसाठी ‘आयएमपीएस’ हादेखील चांगला पर्याय आहे, मात्र यात केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच पेमेंट करता येते व हे पेमेंट मोबईल बँकिंग अथवा नेट बँकिंग पद्धतीनेच करता येते. बँकेत जाऊन करता येत नाही. थोडक्यात, जे मोबाईल बँकिंग अथवा नेट बँकिंग वापरत नाहीत. त्यांना हा पर्याय वापरता येणार नाही.

ज्यांना दोन लाख रुपयांच्या आत पेमेंट करावयाचे आहे व तासाभरात लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा झाली, तरी चालणार आहे, त्यांना ‘एनईएफटी’ हा पर्याय योग्य असेल. ‘एनईएफटी’ किंवा ‘आरटीजीएस’ हे दोन्ही पर्याय ऑनलाइन (मोबाईल बँकिंग अथवा नेट बँकिंग) करता येतात; तसेच ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष बँकेत जाऊनसुद्धा करता येतात.

कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्डची बिले ‘एनईएफटी’द्वारे भरता येतात.‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ व ‘आयएमपीएस’ यातील ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असून, ‘आयएमपीएस’ हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या (एनपीसीआय) नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे भीम, गुगलपे, फोनपे आदींद्वारे होणारे यूपीआय पेमेंट हे ‘आयएमपीएस’ प्लॅटफॉर्मवरूनच होत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT