Nepal bans sale of Everest, MDH spices over safety concerns  Sakal
Personal Finance

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Nepal bans sale of Everest, MDH spices: MDH आणि EVEREST मसाल्यांमध्ये हानिकारक रसायनांची भेसळ असल्याचा आरोप समोर आल्यानंतर नेपाळने एव्हरेस्ट आणि MDH मसाल्यांच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

राहुल शेळके

Nepal bans sale of Everest, MDH spices: सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळने MDH आणि EVEREST मसाल्यांवर कारवाई केली आहे. MDH आणि EVEREST मसाल्यांमध्ये हानिकारक रसायनांची भेसळ असल्याचा आरोप समोर आल्यानंतर नेपाळने एव्हरेस्ट आणि MDH मसाल्यांच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

याशिवाय, नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने दोन भारतीय ब्रँड मसाल्यांच्या कर्करोगाला कारणीभूत असलेल्या कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडची चाचणी सुरू केली आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे.

नेपाळ फूड टेक्नॉलॉजीचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, एव्हरेस्ट आणि एमडीएच ब्रँडच्या मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या बाजारात विक्रीवरही आम्ही बंदी घातली आहे.

मसाल्यांमध्ये घातक रसायनांचे नमुने आढळून आल्याच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराजन पुढे म्हणाले की, या दोन विशिष्ट ब्रँडच्या मसाल्यांमधील रसायनांची चाचणी सुरू आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहणार आहे.

सिंगापूर-हाँगकाँगप्रमाणे नेपाळच्या अधिकाऱ्यांनाही दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा जास्त असल्याचा संशय आहे. इथिलीन ऑक्साईड हे असे रसायन आहे ज्यामुळे कर्करोग होतो. आता याच कारणास्तव नेपाळचे अधिकारीही या मसाल्यांची चाचणी घेत आहेत. आणि तपास अहवाल आल्यानंतरच एमडीएच आणि एव्हरेस्टला दिलासा मिळू शकेल.

याआधी, सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) MDH आणि एव्हरेस्टच्या उत्पादनांची गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हाँगकाँग आणि सिंगापूरच्या अन्न सुरक्षा नियामकांकडून तपशील मागवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT