Netflix Subscriber Growth Sakal
Personal Finance

Netflix: नेटफ्लिक्सची खेळी! पासवर्ड शेअरिंगवर बंधने असतानाही सब्सक्रिप्शनमध्ये झाली एवढ्या टक्क्यांची वाढ

Netflix Subscriber Growth: गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कंपनीला अधिक ग्राहक मिळाले आहेत.

राहुल शेळके

Netflix Subscriber Growth: नेटफ्लिक्सने त्यांच्या काही योजनांसाठी नवीन किंमत वाढीची घोषणा केली आहे, ज्याचा परिणाम यूएस, यूके आणि फ्रान्समधील ग्राहकांवर झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नेटफ्लिक्स कंपनी ऑफर प्लॅनमुळे चर्चेत होती. गेल्या काही महिन्यांमध्ये नेटफ्लिक्स आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

कंपनीने ग्राहकांच्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली आहे. याचे कारण हॉलिवूड अभिनेते आणि लेखक प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सने किंमतीत वाढ केली आहे.

कंपनीच्या नवीन धोरणानुसार, कोणताही युजर त्याचा आयडी पासवर्ड त्याच्या मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबियांसोबत शेअर करू शकणार नाही. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या कमाईवर झाला आहे.

नेटफ्लिक्सच्या प्लॅनमध्ये वाढ होऊनही गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कंपनीला अधिक ग्राहक मिळाले आहेत. त्यामुळे कंपनीचे शेअर्स 14.5% वर पोहचले होते. नेटफ्लिक्सला सप्टेंबर तिमाहीत जगभरातून 247 दशलक्ष ग्राहक मिळाले आहेत. भारतीय मल्टिप्लेक्स PVR आयनॉक्सने देखील आपल्या तिमाही निकालांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Netflix ने जागतिक उत्पादनातील मोठ्या वाढीचा तसेच मीडिया स्पर्धकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेतला आहे. मागील तीन महिन्यांत कंपनीचे सुमारे 9 दशलक्ष ग्राहक वाढले आहेत. सप्टेंबर तिमाहीत Netflix चे शेअर्स 396.20 डॉलरवर पोहोचले आहेत. ज्यामुळे ते जवळपास तीन वर्षातील सर्वोच्च पातळी आहेत. यासह, कंपनीचे मार्केट कॅप 22 बिलियन डॉलरवर पोहचले आहे.

पीव्हीआर आयनॉक्सच्या तिकीट विक्रीत 109% वाढ

भारतीय मल्टिप्लेक्स PVR आयनॉक्सने सप्टेंबर तिमाहीत तिकीट विक्री 109% वाढली आहे. तर या तिमाहीत कंपनीला 166 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

सरासरी तिकीट किंमत, खाद्य पदार्थ आणि शीतपेय यांच्यावरील दरडोई खर्चात अनुक्रमे 25% आणि 15% ची वार्षिक वाढ झाली आहे तसेच जाहिरात विक्रीत 41% वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT