Income Tax Sakal
Personal Finance

Income Tax: CBDT ने सुरू केली आयकर विभागाची नवीन वेबसाइट, करदात्यांना असा होणार फायदा

Income Tax: आयकर विभागाने एक नवीन वेबसाइट लॉन्च केली आहे.

राहुल शेळके

Income Tax: आयकर विभागाने शनिवारी एक नवीन वेबसाइट लॉन्च केली ज्यात नवीन फिचर आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी उदयपूर येथे आयकर संचालनालय (सिस्टम्स) आयोजित 'चिंतन शिविर' येथे नवीन वेबसाइट लाँच केली.

सीबीडीटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, करदात्यांच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी नवीन प्राप्तिकराची सुधारित वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय वेबसाइटची URL www.incometaxindia.gov.in आहे.

वेबसाइट मोबाईलवर काम करेल

लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर इन्कम टॅक्सची वेबसाईट अधिक चांगल्या प्रकारे काम करते असे सर्वसाधारणपणे दिसून येते, परंतु सुधारित वेबसाइट मोबाईलनुसार नव्याने डिझाइन करण्यात आली आहे. नवीन वेबसाइटचा उद्देश करदात्यांना सुविधा आणि शिक्षण देणे हा आहे, अशी माहिती सीबीडीटीकडून देण्यात आली.

कोणते नवीन फीचर्स जोडले आहेत?

प्राप्तिकराच्या सुधारित वेबसाइटवर मेगा मेनू पर्याय आहे, ज्यामध्ये नवीन वैशिष्ट्ये असतील. वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी मार्गदर्शक व्हर्च्युअल टूर देखील देण्यात आला आहे. नवीन वैशिष्ट्यांमध्ये कायदे, विभाग आणि कर, करारांची तुलना समाविष्ट आहे. तसेच इतर पोर्टल्सच्या महत्त्वाच्या लिंक्स देखील दिल्या आहेत.

करदात्यांची वाढती संख्या

देशात आयकर भरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 31 जुलैपर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 6.77 कोटी लोकांनी ITR सबमिट केले होते. यामध्ये प्रथमच कर जमा करणाऱ्यांची संख्या 53.67 लाख होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT