nirav modi pnb scam Mumbai sessions court approves petition on nirav modi 71 crores worth assets possession  sakal media
Personal Finance

Nirav Modi : पंजाब नॅशनल बँकेला मोठा दिलासा; निरव मोदीची संपत्ती ताब्यात घेण्यास मिळाली मंजूरी

अंमलबजावणी संचालनालयाने सदर संपत्ती जप्त केल्याची कारवाई केली होती.

रोहित कणसे

पंजाब नॅशनल बँकेला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा दिला आहे, नीरव मोदींची 71 कोटींची संपत्ती ताब्यात देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने बुधवारी सदर याचिकेला परवानगी दिली.

पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांचे कन्सोर्टियम यांनी फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीची 71 कोटी रुपयांची मालमत्ता सोडण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयात केली होती. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने सदर संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती.

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कुर्ल्यातील कोहिनूर शहरातील कार्यालयाची जागा, सुमारे 24.6 कोटी रुपयांच्या खालच्या तळघरातील पाच झाकलेल्या कार पार्किंगच्या जागा, 26 लाख रुपयांच्या बेंटलीसह आठ वाहने, 9.8 लाख रुपयांची फोर्स मोटर ट्रॅव्हलर आणि 2.3 लाख रुपयांची अल्टो आणि फोर सीझन्स हॉटेलमध्ये 35.5 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या 16 नगांच्या साठ्याचा समावेश आहे. ही संपत्ती आता पीएनबी आपल्या ताब्यात घेऊन नियमाप्रमाणे करणार कारवाई करणार आहे.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Leopard Attacks: शिरूरमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्यांच्या हल्ल्यांवर निष्क्रिय प्रशासनाविरोधात तहसीलदार कार्यालयाला टाळे"

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT