Personal Finance

Budget 2024 Tourism: बजेटमधूनही मालदीवला दणका! लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी केल्या या घोषणा

अर्थसंकल्पातूनही मालदीवला दणका! लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवणार.. अर्थमंत्र्यांची घोषणा

Aishwarya Musale

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, लक्षद्वीपमध्ये नवीन प्रकल्प सुरू होतील. तसेच, पर्यटन क्षेत्राच्या विकासाला वेग आला आहे, असे देखील त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

जर आपण विशिष्ट क्षेत्रांबद्दल बोललो तर, प्रवास आणि पर्यटन क्षेत्र हे देखील महत्त्वाचे आहे. लक्षद्वीपमधील पर्यटन पायाभूत विकासावर भर दिला जाईल. नवीन कॉटेज हाऊस, रिसॉर्ट्स, गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स बांधण्यासाठी प्रोत्साहन शक्य आहे. तसेच ज्याप्रमाणे मालदीवमध्ये विमानतळावरून बेटावर जाण्यासाठी जेटी उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे लक्षद्वीपमध्येही पायाभूत सुविधा तयार केल्या जातील.

पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर आणि त्यानंतर मालदीवशी झालेल्या वादानंतर लक्षद्वीपचा मालदीवसारखा विकास करण्यासाठी रूपरेषा तयार केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्यात 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT