Nirmala Sitharaman gdp in budget 2024 is governance development and performance  Sakal
Personal Finance

Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी सांगितला GDP आणि FDIचा नवा 'अर्थ'

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की 'सरकार, विकास आणि कामगिरी' (Governance, Development & Performance) हा सरकारसाठी जीडीपीचा नवा अर्थ आहे.

राहुल शेळके

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की 'सरकार, विकास आणि कामगिरी' (Governance, Development & Performance) हा सरकारसाठी जीडीपीचा नवा अर्थ आहे. यासोबत त्यांनी आणखी एका शब्दाची व्याख्या केली आहे. FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया.

केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या 10 वर्षात बरेच सकारात्मक बदल झाले आहेत आणि आम्ही 2047 पर्यंत विकसित भारताच्या दिशेने काम करत आहोत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन मिळाल्याने त्यांच्या अन्नासंबंधीची चिंता संपली आहे. त्या म्हणाल्या की 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा भारतासमोर मोठी आव्हाने होती आणि सरकारने या आव्हानांवर योग्य पद्धतीने मात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, त्यांचे सरकार गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना पाच वर्षांसाठी वाढवेल.

सीतारामन म्हणाल्या की, आमच्या कामाच्या आधारे आम्हाला आशा आहे की सरकारला पुन्हा चांगला जनादेश मिळेल. देशाने कोविड-19 महामारीच्या आव्हानांवर मात करून आत्मनिर्भर भारताचा पाया घातला आहे.

या काळात त्यांनी सरकारच्या उपलब्धींचीही गणना केली आणि सांगितले की, पीएम मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना 30 कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच, देशातील 1.4 कोटी तरुणांना स्किल इंडिया मिशनचा लाभ झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT