Nirmala Sitharaman Husband Parakala Prabhakar
Nirmala Sitharaman Husband Parakala Prabhakar  Sakal
Personal Finance

Parakala Prabhakar: 'मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत...' अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा

राहुल शेळके

Parakala Prabhakar on Election: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, देशाचे संविधान बदलेल. मोदी स्वतः लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण देतील आणि संपूर्ण देशात लडाख-मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल. असा दावा केला आहे.

परकला प्रभाकर यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसने आपल्या X अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले होते की, पीएम मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यास देशात काय बदल होईल? (Finance Minister Nirmala Sitharaman Husband Parakala Prabhakar No Election in 2029 if BJP PM Narendra Modi Wins 2024 Lok Sabha Election)

याला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांचे पती म्हणाले, "असे झाले तर तुम्ही पुन्हा निवडणुकीची अपेक्षा करू शकत नाही. जर हे सरकार 2024 च्या निवडणुकीनंतर परत आले तर निवडणुका होणार नाहीत"

मणिपूरसारखी परिस्थिती संपूर्ण देशात होईल: अर्थतज्ज्ञ परकाला

निर्मला सीतारामन यांचे पती परकला म्हणाले, "सध्या तुम्हाला असं वाटत आहे की मणिपूरमध्ये हिंसाचार घडत आहे, त्यामुळे दुसरीकडे घडण्याची शक्यता नाही. तुम्हाला असा विचार करण्याची गरज नाही, कारण आज मणिपूरमध्ये जे काही घडत आहे ते उद्या तुमच्या किंवा आमच्यासोबत होईल. लडाख, मणिपूर सारखी परिस्थिती किंवा शेतकऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते तशी परिस्थिती संपूर्ण देशात घडेल."

यापूर्वीही प्रभाकर यांनी सरकारवर अनेक आरोप केले आहेत

याआधीही प्रभाकर यांनी नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर अनेकदा सरकारला धारेवर धरले होते. याशिवाय परकला प्रभाकर यांनी अलीकडेच इलेक्टोरल बाँडबाबत सांगितले होते की, हा केवळ देशातील सर्वात मोठा घोटाळा नाही तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

याशिवाय परकला प्रभाकर यांनी 2019 मध्ये द हिंदू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात आर्थिक आघाडीवरही सरकारला सल्ला दिला होता. अर्थव्यवस्थेला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी भाजपने पीव्ही नरसिंह राव-मनमोहन सिंग यांचे आर्थिक धोरण स्वीकारले पाहिजे, असे ते म्हणाले होते.

प्रभाकर हे निर्मला सीतारामन यांचे पती आहेत

अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी 2014 ते 2018 पर्यंत आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट पदावर काम केले आहे. त्यांनी जेएनयूमधून एमए आणि एम.फिल केले.

प्रभाकर यांनी 1991 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून पीएचडी केली. 2008 मध्ये त्यांनी प्रजा राज्यम पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले. त्यांनी 'द क्रुकड टिंबर ऑफ न्यू इंडिया' नावाचे पुस्तकही लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

Buddha Purnima 2024 : बाबासाहेबांनी केली होती बुद्ध जयंतीला सुट्टीची मागणी

HSC Result 2024 : भलामोठा डोंगर चढून केली पायपीट अन् लेकीसोबत मिळवलं बारावीच्या परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT