RBI  Sakal
Personal Finance

RBI Guidelines: आरबीआयने कर्ज खात्यातील दंडाबाबत बँकांना दिल्या सूचना, केला मोठा बदल

RBI Guidelines: रिझर्व्ह बँकेने वित्तीय संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

राहुल शेळके

RBI Guidelines: भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत कर्ज खात्यातील दंडाबाबत अनेक नियमांबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँका आणि नियमन केलेल्या संस्थांनी त्यांचे महसूल वाढवण्यासाठी कर्ज खात्यांवर दंडाचा पर्याय वापरू नये.

रिझव्‍‌र्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले असून त्याअंतर्गत त्यांनी बँकांना कर्ज खात्यांवर दंड कसा भरावा हे सांगितले आहे. बँका कर्जावर आकारल्या जाणार्‍या व्याजात दंडाची भर घालत आहेत आणि त्या आधारावर कर्जदारांकडून व्याजाच्या वरती व्याज घेत आहेत अशा अनेक घडामोडींनंतर RBI ने हा निर्णय घेतला आहे.

आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, जेणेकरून कर्ज चुकल्यास, बँकांकडून आकारला जाणारा दंड हा दंडात्मक व्याज म्हणून नव्हे तर दंडात्मक शुल्क म्हणून आकारला जाईल.

ही मार्गदर्शक तत्त्वे का जारी करण्यात आली आहेत?

आरबीआयच्या मते, ही मार्गदर्शक तत्त्वे "कर्जाची शिस्त निर्माण करण्यासाठी" जारी करण्यात आली आहेत. आरबीआयच्या परिपत्रकानुसार, ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पब्लीक टेक प्लॅटफॉर्म प्रकल्प सुरू करणार आहे. याद्वारे, आवश्यक डिजिटल माहितीमुळे कर्जदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज वितरण करणे सोपे होईल.

पायलट प्रोजेक्ट दरम्यान, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या बँका किसान क्रेडिट कार्ड 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, दूध उत्पादकांना कर्ज, एमएसएमई उद्योगाला कोणत्याही तारण न देता कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज देता येणार आहे.

या प्लॅटफॉर्मद्वारे, आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक केवायसी, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅन वैधता, आधार ई-स्वाक्षरी आणि घर आणि मालमत्ता डेटा लिंक केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT