‘पेटीएम बँके’बाबत फेरआढावा नाही; कारवाईबाबत शक्तिकांत दास  Sakal
Personal Finance

Paytm Bank : ‘पेटीएम बँके’बाबत फेरआढावा नाही; कारवाईबाबत शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण

पेटीएम पेमेंट्स बँकेवर (पीपीबीएल) रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईबाबत कोणताही फेरआढावा घेतला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेवर (पीपीबीएल) रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईबाबत कोणताही फेरआढावा घेतला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०६व्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या.

दास म्हणाले, ‘‘ हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा पुन्हा आढावा घेण्याची कोणतीही गरज नाही. रिझर्व्ह बँक कोणत्याही ‘फिनटेक’च्या विरोधात नाही. परंतु, ग्राहक व ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे हे बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. रिझर्व्ह बँकेने फिनटेक क्षेत्राला नेहमीच पाठिंबा दिला असून, त्याच्या वेगवान वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.’’

नियमन केलेल्या संस्थांना नियमांचे पालन करण्यास सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध अशी कारवाई केली जाते. पेटीएम पेमेंट्स बँकेनेही अशा सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच ग्राहकांच्या हितासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) जारी केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT