Who is Noel Tata Sakal
Personal Finance

Tata Trust chairman: टाटा ट्रस्टचा पुढील अध्यक्ष कोण होणार? नोएल टाटांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

Who is Noel Tata: दिवंगत रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी टाटा ट्रस्ट्स शुक्रवारी सकाळी एक बैठक आयोजित करत आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ट्रस्टचे प्रमुख म्हणून नामनिर्देशित करण्याची शक्यता आहे.

राहुल शेळके

Who is Noel Tata: दिवंगत रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी टाटा ट्रस्ट शुक्रवारी सकाळी एक बैठक आयोजित करत आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ट्रस्टचे प्रमुख म्हणून नामनिर्देशित करण्याची शक्यता आहे.

नोएल टाटा हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत ज्यांच्याकडे टाटा सन्सची 66% मालकी आहे. या प्रकरणावर टाटा ट्रस्टने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी दोनदा लग्न केले होते. पहिले लग्न सुनी कमिश्रिएट यांच्याशी झाले होते. रतन टाटा आणि जिमी टाटा अशी सुनी आणि नवल टाटा यांच्या दोन मुलांची नावे आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये स्विस उद्योगपती सिमोनशी लग्न केले. त्यांच्या आणि सिमोनच्या मुलाचे नाव नोएल टाटा आहे.

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे मोठे उद्योगपती आणि करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत. नोएल सध्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, व्होल्टास लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत. ते सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट बोर्डाचे विश्वस्त देखील आहेत. याशिवाय नोएल हे टायटन कंपनी लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष आहेत. ते ट्रेंट लिमिटेडचे ​​11 वर्षे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.

नोएल टाटा यांनी यूकेच्या ससेक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी फ्रान्सच्या INSEAD बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे. नोएल टाटा यांनी टाटा सन्समधील सर्वात मोठे भागधारक आणि सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री यांच्याशी लग्न केले आहे.

या जोडप्याला तीन मुले आहेत, ज्यात लीह टाटा, माया टाटा आणि नेव्हिल टाटा यांचा समावेश आहे. नोएल टाटा यांची मुलगी लीह टाटा देखील टाटा समूहात आपला ठसा उमटवत आहे. तिने स्पेनमधील प्रतिष्ठित IE बिझनेस स्कूलमध्ये मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि सध्या टाटा समूहासोबत काम करत आहे.

लीहने 2006 मध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून तिच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. सध्या ती ताज हॉटेल्समध्ये विकास आणि विस्तार व्यवस्थापक म्हणून काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाचा यलो अलर्ट

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT