nps scheme financial plan after retirement life Sakal
Personal Finance

हवे संचिताचे पाठबळ...

आपल्या मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे विवाह यांसह आपल्या वृद्धापकाळाची आर्थिक तरतूद यासाठी कमावत्या वर्षांमध्येच आर्थिक नियोजन करणे श्रेयस्कर आहे. आपल्या निवृत्तीपश्‍चातच्या सुखावह जीवनासाठी मोठ्या रकमेची गरज असते.

सकाळ वृत्तसेवा

- पुरुषोत्तम बेडेकर

आपल्या मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे विवाह यांसह आपल्या वृद्धापकाळाची आर्थिक तरतूद यासाठी कमावत्या वर्षांमध्येच आर्थिक नियोजन करणे श्रेयस्कर आहे. आपल्या निवृत्तीपश्‍चातच्या सुखावह जीवनासाठी मोठ्या रकमेची गरज असते. निवृत्तीनियोजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी आपल्या जोखीमप्रकृतीनुसार योग्य पर्याय आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने निवडणे फायद्याचे असते.

निवृत्तीनियोजनासाठी एक महत्त्वाचे आणि तुलनेने नवे साधन म्‍हणजे ‘एनपीएस’ अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना. निवृत्तीनंतरची आर्थिक चिंता कमी व्हावी आणि कमावत्या काळात प्राप्तिकरामध्‍ये बचत व्‍हावी, यासाठी सर्वांना सामावून घेणारी ही योजना आहे.

‘एनपीएस’ची सुरुवात

केंद्र सरकारने जानेवारी २००४ मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) सुरू केली. सैन्यदल वगळता केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी, बहुतांश राज्य सरकारी कर्मचारी या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. कालांतराने २००९ मध्ये ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी ऐच्छिक आधारावर खुली करण्यात आली.

खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, मर्यादित जोखीम क्षमता असणाऱ्या आणि निवृत्तीनंतर नियमित पेन्शनची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना अत्यंत मोलाची आहे. गेल्या दशकामध्ये प्राप्तिकराच्या नियमात केलेले बदल, सदस्यांच्या फायद्यासाठी दिलेल्या नवनव्या सुविधा आणि अधिकाधिक लवचिकता यामुळे ही योजना अधिक आकर्षक झाली आहे.

वैशिष्ट्ये

लवचिकता ः सदस्याला त्याचे गुंतवणूक पर्याय; तसेच विशिष्ट पेन्शन फंड निवडण्‍याची आणि त्यात वेळोवेळी बदल करण्याची मुभा आहे.

किफायतशीर : ही देशातील सर्वांत कमी खर्च असलेली पेन्शन योजना आहे. (वार्षिक कमाल फंड व्यवस्थापन खर्च ०.०९ टक्के)

करसवलत : ‘एनपीएस’ खात्यामध्ये केलेले योगदान हे प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रूपये, ८० सीसीडी (१ब) अंतर्गत ०.५० लाख रुपयांपर्यंत वजावटीसाठी पात्र असते; तसेच आपला नियोक्ताही योगदान देत असेल, तर पगाराच्या १० ते १४ टक्के अतिरिक्त करसवलत मिळू शकते. या तिन्ही सवलतींचा फायदा घ्यायचा असेल, तर मात्र जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडावा लागेल. ही योजना कलम ‘ईईई’ अंतर्गत करसवलतीस पात्र असली, तरी ॲन्युइटी सुरू झाल्यावर दरमहा मिळणारी पेन्शन करपात्र असते.

किमान वार्षिक योगदान १,००० रुपये

दोन प्रकारची खाती ः ‘एनपीएस’ अंतर्गत सदस्य दोन प्रकारची खाती असतात. टिअर १ खाते हे सदस्याचे निवृत्ती खाते असते. त्यात नियमित गुंतवणूक करावी लागते; पण त्यातून निवृत्तीच्या वेळीच पैसे काढता येतात. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यातून अंशत: पैसे काढता येतात.

टिअर २ खाते उघडणे ऐच्छिक असते; तसेच या खात्याच्‍या वापरात लवचिकता असते.

निवृत्तीच्या वेळी एकूण रकमेच्या कमाल ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येते, तर उर्वरित ४० टक्के रकमेमधून नियमित पेन्शनसाठी ‘अॅन्युइटी’ प्लॅन घ्यावा लागतो.

निवृत्तीच्या वेळी उपलब्ध एकूण निधी पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते.

सदस्याने नोकरी किंवा शहर बदलले, तरी त्याच ‘एनपीएस’ खात्याचा वापर करता येतो.

(‘एनपीएस’ विषयावरील सविस्तर लेख ‘सकाळ मनी’च्‍या एप्रिल २०२४ च्‍या अंकामध्‍ये वाचता येईल.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Pawna Dam News : पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर पाटबंधारे विभागाची जोरदार कारवाई!

Pune Municipal Election : मतदारांच्या पळवापळवीने इच्छुकांचे धाबे दणाणले

Ambegaon News : २५०० पशुधनावर एकच दवाखाना; एक्स-रे, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा देणारे ‘तालुका सर्वचिकित्सालय’ रखडले!

SCROLL FOR NEXT