Bank Holidays in October 2024 Sakal
Personal Finance

Bank Holidays October: ऑक्टोबरमध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या? सणासुदीसाठी आताच करा पैशांचे नियोजन

Bank Holidays in October 2024: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असून ऑक्टोबरने दार ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यंदा ऑक्टोबर हा सणांच्या हंगामातील सर्वात मोठा महिना असणार आहे. गांधी जयंती, नवरात्री, दसरा, दिवाळी असे सर्व मोठे सण याच महिन्यात येणार आहेत.

राहुल शेळके

Bank Holidays in October 2024: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असून ऑक्टोबरने दार ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यंदा ऑक्टोबर हा सणांच्या हंगामातील सर्वात मोठा महिना असणार आहे. गांधी जयंती, नवरात्री, दसरा, दिवाळी असे सर्व मोठे सण याच महिन्यात येणार आहेत. या काळात तुम्हाला साफसफाई, रंगकाम, नवीन वस्तू खरेदी करणे यासारखी कामे करावी लागतील.

यासाठीही पैसा लागतो. मात्र, ऑक्टोबरमध्ये सण असल्याने बँका सलग अनेक दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक हॉलिडे लिस्टकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे.

बँकेला सुमारे 15 दिवस सुट्टी असणार आहे

RBI दर महिन्याच्या सुरूवातीस बँक सुट्टीची यादी प्रसिद्ध करते. यादीनुसार, ऑक्टोबरमध्ये 31 दिवसांपैकी सुमारे 15 दिवस सुट्या असतील. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह सणासुदीचाही समावेश आहे. या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमुळे ऑक्टोबरमध्ये बँक एक दिवस बंद राहणार आहे. गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा आणि दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या असतील.

ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?

  • 1 ऑक्टोबर - विधानसभा निवडणुकीमुळे जम्मूमध्ये बँका बंद राहतील.

  • 2 ऑक्टोबर - गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.

  • 3 ऑक्टोबर - जयपूरमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेमुळे बँकांना सुट्टी असेल.

  • 6 ऑक्टोबर - रविवारमुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल.

  • 10 ऑक्टोबर - आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे बँका बंद राहतील.

  • 11 ऑक्टोबर - आगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इम्फाळ, कोलकाता, पाटणा, रांची आणि शिलाँग येथे दसरा, महाअष्टमी, महानवमी, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमीमुळे बँकेला सुट्टी राहील.

  • 12 ऑक्टोबर - दसरा, विजयादशमी, दुर्गापूजा यामुळे देशभरातील बँका जवळपास बंद राहणार आहेत.

  • 13 ऑक्टोबर - रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

  • 14 ऑक्टोबर - गंगटोकमध्ये दुर्गापूजा किंवा दसेननिमित्त बँकांना सुट्टी असेल.

  • 16 ऑक्टोबर - लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आगरतळा आणि कोलकाता येथे बँका बंद राहतील.

  • 17 ऑक्टोबर - महर्षि वाल्मिकी जयंती आणि कांती बिहू या दिवशी बंगळुरू आणि गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल.

  • 20 ऑक्टोबर - रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

  • 26 ऑक्टोबर - चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

  • 27, ऑक्टोबर - रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.

  • 31 ऑक्टोबर - दिवाळीनिमित्त जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे.

UPI आणि नेट बँकिंग सुरु राहणार

ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामामुळे देशातील अनेक राज्यांतील बँकांना वेगवेगळ्या सणांच्या दिवशी सुट्या असतात, मात्र त्यानंतरही तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम थांबणार नाही. बँकेची सुट्टी असली तरी व्यवहार करण्यासाठी तुम्ही UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकता. याशिवाय एटीएममधूनही पैसे काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT