Bhavish Aggarwal Kunal Kamra Sakal
Personal Finance

OLA CEO: 'कॉमेडियन बनू शकला नाही अन्...' ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल कुणाल कामरावर का भडकले?

Bhavish Aggarwal Kunal Kamra: इलेक्ट्रिक स्कूटर (ई-स्कूटर) उत्पादक कंपनी ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा हे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्यांच्यातील ऑनलाइन संघर्ष इतका तीव्र झाला आहे.

राहुल शेळके

Bhavish Aggarwal Kunal Kamra: इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा हे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्यांच्यातील ऑनलाइन संघर्ष इतका तीव्र झाला आहे की दोघांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून एकमेकांचा अपमान करण्यास सुरुवात केली आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीनंतर दोघांमध्ये ग्राहक सेवेबाबत जोरदार वाद सुरू झाला आणि तो वाढतच गेला.

अलीकडेच, ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात ट्विटर (आता एक्स) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार वादा झाला. कॉमेडियन कामरा यांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर (ओला ई-स्कूटर) खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या सेवा समस्यांबद्दल कंपनीवर टीका केली तेव्हा या वादाची सुरुवात झाली.

ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनीही या ऑनलाइन टीकेवर प्रतिक्रिया दिली. यानंतर एक्स प्लॅटफॉर्मवरच या प्रकरणाला वेग आला आणि दोन्ही बाजूंनी केलेल्या पोस्टने एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली.

कामरा यांच्या पोस्टने वादाला सुरुवात

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या संख्येने सर्व्हिस सेंटरमध्ये उभ्या असल्याचे दिसले होते आणि हा फोटो शेअर करताना त्यांनी कंपनीच्या ग्राहक सेवेबद्दल चिंता व्यक्त केली होती.

एवढेच नाही तर कामरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही पोस्टमध्ये टॅग केले होते आणि त्यांना विचारले होते की, भारतीय लोक अशा प्रकारच्या ईव्ही वापरतील का, असे आवाहन करताना त्यांनी ओलाच्या ग्राहकांना लिहिले होते की, ज्यांना ओला इलेक्ट्रिकशी काही समस्या आहे, टॅग करून त्यांनी अनुभव लिहावा.

ओलाच्या सीईओने केली पोस्ट

ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी कॉमेडियनच्या या पोस्टवर लगेच प्रतिक्रिया दिली आणि ग्राहक सेवेशी संबंधित आरोप फेटाळून लावले. ओलाच्या सीईओने कॉमेडियनच्या पोस्टवर टीका केली आणि म्हटले की, अशा पोस्टसाठी त्यांना पैसे दिले जात आहेत.

ऑनलाइन संघर्षाचा हा मुद्दा इथेही थांबला नाही, पण कामरा यांनी पुन्हा एकदा ओलाच्या सीईओच्या पोस्टवर जोरदार प्रहार करत लिहिले की, पैसे देऊन ट्विट, कॉमेडी करिअर अयशस्वी आणि शांतपणे बसा. या ट्विटसाठी मला पैसे दिले गेले किंवा खाजगी कंपन्यांच्या विरोधात मी जे काही बोललो ते तुम्ही सिद्ध करू शकलात तर मी सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलीट करेन आणि कायमचा शांत राहीन.

कॉमेडियन कामरा यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, 'गेल्या 4 महिन्यांत ज्यांनी तुमची गाडी खरेदी केली आहे आणि जे खरे ग्राहक आहेत त्यांना तुम्ही 100 टक्के परतावा देऊ शकत नाही... परंतु तुम्ही मला पैसे देऊ इच्छिता, जो ग्राहक नाही.'

भाविश अग्रवाल देखील थांबण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून आले आणि त्यांनी कामरा यांच्या पोस्टला तीव्र प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, मी तुला तुझ्या फ्लॉप शोपेक्षा जास्त पैसे देईन. इतकंच नाही तर आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ओलाच्या सीईओने पुढे लिहिलं की, 'तो कॉमेडियन बनू शकला नाही आणि आता 'चौधरी' बनायला चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

Dhurandhar Trailer Launch : रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर येतोय!

बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Latest Marathi Breaking News : अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Suhana Swasthyam 2025 : ‘फूडफार्मर’ रेवंत यांचे ‘स्वास्थ्यम्’मध्ये व्याख्यान; खाद्यपदार्थांवरील लेबल्स वाचायचे कसे, हे कळणार सोप्या शब्दांत

SCROLL FOR NEXT