OnePlus, Realme plans to exit manufacturing and sales in India  Sakal
Personal Finance

TV Market: दिवाळीच्या तोंडावर चिनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद

TV Market In India: चीनच्या आघाडीच्या कंपन्या भारतातलं उत्पादन बंद करणार आहेत

राहुल शेळके

TV Market In India: चीनच्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या OnePlus आणि RealMe ने भारतातील टेलिव्हिजनचे उत्पादन आणि विक्री थांबवली आहे. दोन्ही कंपन्यांची भारतातील स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक आहे पण अचानक त्यांनी या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनची कंपनी Xiaomi भारताच्या स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की OnePlus आणि Realme स्मार्टफोन व्यवसायात कायम राहतील.

या कंपन्यांनी भारतात टीव्ही विक्री चॅनेल आणि ब्रँडिंगमध्ये गुंतवणूक केली होती. याशिवाय, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने हॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग सेवांच्या वाढीमुळे देशातील स्मार्ट टीव्हीच्या मागणीवर याचा परिणाम झाला आहे.

क्रिकेट विश्वचषकामुळे देशात टीव्हीच्या विक्रीत मोठी वाढ होत असताना या दोन्ही कंपन्यांनी टीव्हीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सणासुदीचा हंगामही सुरू आहे. त्यामुळे टीव्हीसह सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली आहे.

चीनी कंपन्या Xiaomi, OnePlus, Realme, TCL आणि iFalcon यांनी 2017-18 मध्ये भारतातील स्मार्टफोन टीव्ही मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री केली होती. या कंपन्यांनी एलजी, सॅमसंग आणि सोनी पेक्षा 30 ते 50 टक्के स्वस्त असलेले मॉडेल लॉन्च केले होते.

बाजारावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनी टीव्ही ब्रँड किंमती कमी करून बाजार काबीज करत होत्या. त्यामुळे त्यांचे नुकसान वाढले. यामुळेच त्यांनी आता टीव्ही क्षेत्रातील उत्पादन बंद केले आहे. त्यांचे लक्ष आता पूर्णपणे स्मार्टफोन मार्केटवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT